लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळात थकबाकीदारांविरोधात धडक मोहीम राबविण्यात येत आहे. आतापर्यंत पाच हजारांच्या वर वीज बिल असलेल्या ४८४ ग्राहकांचा वीजपुरवठा थकबाकीमुळे ख्ांडित करण्यात आला आहे.वीज बिल हाती आल्याबरोबर वीज बिलाचा भरणा करणारे ग्राहक कमी तर थकबाकीदार अधिक प्रमाणात असल्याने महावितरण अडचणीत सापडले आहे. विकल्या गेलेल्या विजेच्या प्रत्येक युनिटची वीज बिलाच्या माध्यमातून वसुली करून परत वीज विकत घेवून ग्राहकांना वीजपुरवठा करण्याची जवाबदारी पार पाडताना थकबाकीदारामुळे महावितरणला अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे.महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळात घरगुती ग्राहकांकडे १८ कोटी ४२ लाख रुपये थकबाकी आहे. तर वाणिज्यिक ग्राहकांकडे पाच कोटी ६८ लाख थकबाकी आहे. औद्योगिक ग्राहकांकडे ६१ लाख थकबाकी जमा झाली आहे. कृषिपंपधारकांकडे तब्बल ९४ कोटी ५० लाख रुपये थकित आहेत.चंद्रपूर व गडचिरोली ग्रामीण व शहरी पाणीपुरवठा योजना ९७ लाख तर ग्रामीण व शहरी पथदिव्यांची थकबाकी २२५ कोटी १७ लाख झाली आहे.महावितरणचा कारभार सुरळीत चालण्याकरिता ग्राहकांनी वापरलेल्या प्रत्येक विजेच्या युनिटची वसुली होणे गरजेचे आहे. वीज ग्राहकांकडून वीज बिल विहित मुदतीत वसूल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सोबतच वसुलीत निष्काळजीपणा बाळगणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत.सर्व थकबाकीदार ग्राहकांनी थकित असलेले वीज बिल त्वरित भरून महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता अरविंद भादिकर यांनी केले आहे.
४८४ ग्राहकांचा वीजपुरवठा ख्ांडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 11:06 PM
महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळात थकबाकीदारांविरोधात धडक मोहीम राबविण्यात येत आहे. आतापर्यंत पाच हजारांच्या वर वीज बिल असलेल्या ४८४ ग्राहकांचा वीजपुरवठा थकबाकीमुळे ख्ांडित करण्यात आला आहे.
ठळक मुद्देमहावितरणची मोहीम : कृषिपंपांची थकबाकी ९४ कोटी ५० लाख