साईनाथ कुचनकारलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोना संकट काळात काही दिवस सोडले तर तब्बल दोन वर्ष शाळा बंद होत्या. दरम्यान, नव्या शैक्षणिक वर्षात नियमित शाळा सुरू होणार असून, जिल्ह्यातील तब्बल ८७ हजार ६७ विद्यार्थ्यांना शासनाकडून दोन मोफत गणवेश दिले जाणार आहे. यासाठी जिल्ह्याला ५ कोटी २२ लाख ४० हजार २०० रुपयांचा निधीही मंजूर झाला असून, शाळांकडे वर्ग करण्यात आला आहे. त्यामुळेयावर्षी गणवेश घेण्याचा पालकांचा आर्थिक ताण कमी होणार आहे.इंग्रजी शाळांच्या तुलनेमध्ये जिल्हा परिषद शाळा कुठेही मागे राहू नये यासाठी शासनस्तरावर प्रयत्न केले जात आहे. दरम्यान, चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनी शाळांकडे विशेष लक्ष देणे सुरू केले आहे. याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यात मिशन गरुड झेड हा उपक्रमही सुरू करण्यात आला. वर्ग १ ते ८ च्या विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी मोफत पुस्तकही वितरण करण्यात येणार असून, शाळा समितीच्या निर्णयानुसार मोफत दोन गणवेशही दिल्या जाणार आहे. एका गणवेशासाठी ३०० रुपयांप्रमाणे दोन गणवेशासाठी सहाशे रुपये प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी खर्च केले जाणार आहे.गणवेशाचे शाळांमध्ये पैसे पोहचले असून शाळा व्यवस्थापन समिती विद्यार्थ्यांना गणवेशासाठी निर्णय घेणार आहे. पैसा खर्च करण्याचा अधिकार शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापकांना आहे.
८७०७६ विद्यार्थ्यांना दोन गणवेश- जिल्हा परिषद शाळांतील ८७ हजार ७६ विद्यार्थ्यांना शाळा समिती ठरवतील त्या रंगाचा गणवेश मिळणार आहे. विद्यार्थ्यांना तिनशे रुपयांप्रमाणे प्रत्येकी तीनशे रुपये दोन गणवेश दिले जाणार आहे.
या विद्यार्थ्यांनाही हवाजि.प. शाळांतील इतर मार्गासवर्गीय, ओपन आणि भटक्या जमातीतील विद्यार्थ्यांना गणवेश मिळत नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांनाही गणवेश देण्याची मागणी केली जात आहे.
कोणाला मिळणार गणवेशजिल्हा परिषद शाळेतील १ ते ८ वी पर्यंतच्या सर्व मुली,अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि दारिद्र्य रेषेखालील विद्यार्थ्यांना मोफत गणवेश दिल्या जातो.
बालमनावर परिणामएकाच वर्गातील काही विद्यार्थ्यांना मोफत गणवेश दिल्या जात असताना खुला आणि ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना गणवेश दिल्या जात नाही. त्यामुळे जाती-जातीबद्दल बालमनावर परिणाम पडण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, गणवेश वितरण करताना चिमुकल्यांना उत्तर देताना शिक्षकांनाही मोठा ताण येतो.