शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
5
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
6
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
7
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
8
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
9
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
10
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
11
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
12
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
13
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
14
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
15
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
16
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
17
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
18
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
19
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
20
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड

राज्य सरकारकडे अडकले जीएसटी परताव्याचे ५ कोटी २९ लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2020 5:00 AM

चंद्रपूर महानगर पालिकेकडून दरवर्षी अत्यावश्यक बाबींवर कोट्यवधींचा निधी खर्च केला जातो. प्रामुख्याने कर्मचारी व सेवानिवृत्तांच्या वेतनासाठी सर्वाधिक निधी आरक्षित ठेवावा लागतो. शिवाय, शहरातील पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी आणि अन्य कामांसाठी निधी राखून आरक्षित ठेवले जाते. शिवाय विकास आराखड्यातील मंजूर कामांसाठी स्वतंत्र उभारला जातो.

ठळक मुद्देचंद्रपूर मनपाची अर्थकोंडी : लॉकडाऊनमुळे मालमत्ता कर व जीएसटी परताव्यावरच मतदार

राजेश मडावी ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनामुळे उद्योग-व्यवसायांचे अर्थचक्र थांबले. लॉकडाऊनमध्ये थोडी शिथिलता दिल्याने काही व्यवसाय सुरू झालेत. मात्र, आगामी आर्थिक वर्षात मनपाचे कोट्यवधींचे उत्पन्न घटणार आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी मनपाची मदार आता केवळ मालमत्ता कर आणि जीएसटी परताव्यावरच असणार आहे. विशेष म्हणजे जीएसटी परताव्याचा ५ कोटी २९ लाखांचा निधी राज्य सरकारकडून अद्याप मिळाला नाही. त्यामुळे मनपाला यापुढे विकासकामांचे प्राधान्यक्रमच बदलावे लागणार आहे.चंद्रपूर महानगर पालिकेकडून दरवर्षी अत्यावश्यक बाबींवर कोट्यवधींचा निधी खर्च केला जातो. प्रामुख्याने कर्मचारी व सेवानिवृत्तांच्या वेतनासाठी सर्वाधिक निधी आरक्षित ठेवावा लागतो. शिवाय, शहरातील पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी आणि अन्य कामांसाठी निधी राखून आरक्षित ठेवले जाते. शिवाय विकास आराखड्यातील मंजूर कामांसाठी स्वतंत्र उभारला जातो. यंदा कोरोनामुळे महानगरपालिकेच्या उत्पन्नावर अनिष्ट परिणाम झाला आहे. लॉकडाऊनमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने यंदा महानगर पालिकेला कोट्यवधींच्या महसुली उत्पन्नावर पाणी सोडावे लागणार आहे. दर महिन्याला मनपाला जीएसटी परतावा म्हणून राज्य सरकारकडून रक्कम अदा केली जाते. जीएसटी परताव्याच्या माध्यमातून मनपाच्या तिजोरीत भर पडत असते. कोरोनामुळे उत्पन्न घटल्याने जीएसटी परताव्यावरच मनपाला अवलंबून राहण्याची वेळ आहे. तिजोरीत खळखळाट झाल्यास अत्यावश्यक कामे वगळून काही निर्माणाधिन व प्रस्तावित विकास कामांनाही गुंडाळून ठेवण्याची वेळ मनपावर येऊ शकते. अशा आर्थिक पेचप्रसंगात जीएसटी परतावा मोठा आधार आहे. मात्र, राज्य सरकारकडून ५ कोटी २९ लाख केव्हा मिळणार, याची मनपाला प्रतीक्षा आहे.करवसुली फक्त ५८ टक्केसन २०१८-१९ च्या सुधारित अंदाजपत्रकानुसार ३४ कोटी ९१ लाख आणि सन २०१९-२० च्या अंदाजपत्रकानुसार ३४ कोटी ७२ लाखांचे उत्पन्न निधी विविध प्रकारच्या करातून मनपाला मिळाले. यामध्ये मालमत्ता कराचामोठा वाटा आहे. मात्र, आतापर्यंत केवळ ५८ टक्के कर वसुली झाली. जानेवारी, फेबु्रवारी व मार्च महिन्यातच मोठी कर वसुली होते. लॉकडाऊनमुळे यंदाचे गणित बिघडले. मालमत्ता कर वसुलीसाठी डिमांड बूक छापण्याचे काम सुरू आहे. परंतु, कोरोनाचे संकट पूर्णत: टळल्यानंतरच पुढची कार्यवाही करावी लागणार आहे.कोरोना प्रतिबंधासाठी २ कोटी ३३ लाखकोरोनाविरूद्ध प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी मनपा जिल्हा नियोजन समितीकडून २ कोटी ३३ लाखांचा निधी मिळाला. यातून शहरात अनेक उपाययोजना केल्या जात आहेत, असा दावा मनपाने केला. स्वबळावर निधी उभारणे शक्य नसल्याने कोरोनावर मात करण्यासाठी पुन्हा सुमारे १२ कोटींचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती सूत्राने दिली.कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी मनपाकडून विविध प्रतिबंध उपाययोजना सुरू आहेत. यंदा कर वसुलीवर अनिष्ट परिणाम झाला आहे. राज्य शासनाकडून जीएसटी परताव्याची रक्कम मनपाला येणे बाकी आहे.- राजेश मोहिते,आयुक्त, मनपा, चंद्रपूर

टॅग्स :GSTजीएसटीState Governmentराज्य सरकार