बी. यू. बोर्डेवार ।लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे क्रीडा कौशल्य विकसित व्हावे, यासाठी ५० लाख खर्चून क्रीडा संकुलाचे बांधकाम करण्यात आले. मात्र मागील दहा वर्र्षांपासून या क्रीडा संकुलाची अवस्था अंत्यत दयनीय झाली आहे. बांधकामानंतर एकही स्पर्धा झाली नाही. त्यामुळे शासकीय निधीची उधळपट्टी करणाºया अधिकाºयांवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.ग्रामीण भागातील युवकांमध्ये क्रीडा कौशल्य निर्माण होऊन खेळाडू निर्माण व्हावा, यासाठी लाखो रुपयांचे साहित्य खरेदी करण्यात आले. रनिंग ट्रॅकही बनविण्यात आला. बास्केटबॉलसाठी साहित्य खरेदी झाली. मात्र हे संपूर्ण साहित्य भवनात धूळखात असून भवनाची अवस्था अंत्यत दयनिय झाली आहे. सर्व दरवाजे तुटले. कचºयाचा ढीग साचला. रनिंग ट्रॅकवर कचरा तयार झाला असून क्रीडा संकुल आहे की जंगल आहे, हेच समजायला मार्ग उरला नाही. तालु्क्यातील ग्रामीण भागात अनेक चांगले खेळाडू आहेत. त्यांना प्रोत्साहन दिल्यास राज्य व देश पातळीवर चमकू शकतात. परंतु, अधिकाºयांच्या उदासिनतेमुळे खेळाडूंना संधी मिळत नाही. राज्य शासनाच्या क्रीडा विभागाच्या विविध योजनांची अंमलबजावणी करून क्रीडांगणाचा विकास करा, अशी मागणी करण्यात आली होती.या मागणीची दखल घेऊन निधी उपलब्ध करून दिले असते तर तालुक्याच्या क्रीडा क्षेत्राला मोठी चालना मिळाली असती. सद्य:स्थितीत हे क्रीडा संकूल खेळाडूंसाठी बिनकामी ठरले. होतकरू खेळाडूंना नियमित सराव करण्यासाठी मूलभूत सुविधांचा अभाव आहे. लाखो रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या क्रीडा संकूलाचा काळानुसार विकास करा, अशी मागणी आता जोर धरत आहे.
५० लाखांंचे क्रीडा संकुल धूळखात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 11:51 PM
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे क्रीडा कौशल्य विकसित व्हावे, यासाठी ५० लाख खर्चून क्रीडा संकुलाचे बांधकाम करण्यात आले.
ठळक मुद्देतालुक्यातील क्रीडा क्षेत्राची उपेक्षा : शासनाने खर्च केलेला निधी वाया जाण्याच्या मार्गावर