शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

टीसीसाठी मोजा ५०० रूपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2016 1:29 AM

विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकरिता अतिशय महत्त्वाचा पुरावा म्हणून शाळा सोडल्याचा दाखला (टीसी) आवश्यक आहे.

जि.प. चिमूर शाळेतील प्रकार : गरीब पालकांची लूटराजकुमार चुनारकर खडसंगी (चिमूर)विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकरिता अतिशय महत्त्वाचा पुरावा म्हणून शाळा सोडल्याचा दाखला (टीसी) आवश्यक आहे. पुढच्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला सादर करावा लागतो. मात्र खासगी शाळांच्या विद्यार्थी मिळवण्याच्या शर्यतीमध्ये विद्यार्थ्यांच्या पालकांची पिळवणूक होत असून जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांनी चक्क दाखल्यासाठी पाचशे रुपये आकारणे सुरू केले आहे. त्यामुळे टीसीचे भाव कडाडल्याचे चित्र चिमूर शहरात दिसून येत आहे. जून महिन्यात शाळा सुरू होणार आहेत. त्यामुळे आतापासूनच पालक आपल्या पाल्यांना दुसऱ्या शाळेत प्रवेश मिळावा यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतून वर्ग चार व वर्ग सात मधून उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला काढण्याची लगबग सुरू केली आहे. जि.प. च्या शाळांमध्ये वर्ग एक ते चार तसेच सातवीपर्यंत शिक्षणाची व्यवस्था असल्याने पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना दुसऱ्या शाळेत प्रवेश घ्यावा लागतो. यासाठी शाळा सोडल्याचा दाखला गरजेचा आहे. हा दाखला काढण्यासाठी पालक शाळेत गेले असता, त्यांच्याकडून शाळा सुधार फंड म्हणून ५०० रुपयांची पावती फाडून दाखला देण्यात येत आहे. पैसे दिले नाही तर दाखला देण्यास विरोध केलाजात असल्याची ओरड पालकांकडून सुरू आहे.आरटीई अधीनियमानुसार सर्व विद्यार्थ्यांना मोफत व सक्तीचे शिक्षण मिळावे याकरिता शासनाने हा कायदा केला. या कायद्यामुळे विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळणे, हा विद्यार्थ्यांचा हक्क आहे. मात्र शिक्षणासाठी शाळेत नाव दाखल करण्यासाठी टीसीच्या नावावर चिमूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कन्या क्रमांक एक या शाळेतून पालकाकडून टीसीसाठी शाळा सुधार फंडाच्या नावावर पाचशे रुपये घेतले जात आहे. मुख्याध्यापकाकडून देण्यात येणाऱ्या पावतीवर मात्र सही व शिक्का सुद्धा नाही. त्यामुळे सही व शिक्का मारण्यास मुख्याध्यापक विसरले की जाणीवपूर्वक मारला नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जिल्हा परिषदेच्या शाळात सर्वसामान्य मजूर वर्गाचे विद्यार्थी शिक्षण घेतात. मात्र त्यांच्या पाल्यांच्या पुढील शिक्षणासाठी पाचशे रूपयाचा खर्च न परवडणारा आहे. त्यामुळे जिल्हा परिषद शाळा चिमूरकडून दाखल्यासाठी होत असलेल्या पाचशे रुपयाच्या वसुलीतून गरीब पालकांची लूट होत आहे. या प्रकारावर आळा बसवून अशी सक्ती करणाऱ्या शिक्षकावर कारवाई करण्याची मागणी पालकांकडून होत आहे.आरटीई अधिनियमाचे उल्लंघन० ते १४ वर्षे वयोगटातील सर्व प्रवर्गातील मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण मिळावे यासाठी शासनाने आरटीई कायदा केला. मात्र टीसीसाठी ५०० रुपये शाळा सुधारफंड आकारून चिमूर शहरात या कायद्याचे सर्रास उल्लंघन होत आहे.आपल्या वर्गाची पटसंख्या टिकून राहावी यासाठी खासगी शाळाचे शिक्षक पालकांना अनेक आमिष दाखवित आहेत. टीसीचे पैसेही शिक्षकच देतात, अशा समजूतीतून टीसीचा दर वाढल्याची चर्चा शिक्षक वर्गात सुरू आहे.टीसीसाठी पैसे घेण्याचा नियम नाहीया प्रकाराबाबत शिक्षक विभागाच्या अधिकाऱ्याशी संपर्क साधला असता, टीसीसाठी पैसे घेण्याचा शासनाचा असा कुठलाही नियम नाही. मात्र शाळेच्या भौगोलिक दुरुस्तीसाठी व्यवस्थापन समितीने ठरविले तर काही रक्कम घेता येवू शकते. मात्र बळजबरी करता येत नाही.