शहरं
Join us  
Trending Stories
1
सारे अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात, मुकेश अंबानींनी तर अमेरिकेतच पैसा ओतला... मोठी डील...
2
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
3
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
4
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
5
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
6
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
7
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
8
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
9
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
10
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
11
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
12
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
13
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
14
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
15
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
16
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
17
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
18
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
19
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
20
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...

तीन वर्षांत ५१ कोटींची दारू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2018 11:33 PM

१ एप्रिल २०१५ ला चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी झाली. आता या दारूबंदीला तीन वर्षे लोटली. मात्र अनेक गावातील अवैध दारूविक्रीच्या कारवायांवरून जिल्ह्यात खरोखरच दारूबंदी आहे का, प्रश्न आपुसकच विचारला जाते. दारूबंदीच्या तीन वर्षात सहा लाख ६२ हजार ७२९ लिटर देशी-विदेशी आणि गावठी दारू पोलिसांनी जप्त केली.

ठळक मुद्दे१२१ कोटींचा मुद्देमाल : २५ हजार १५७ आरोपींना अटक

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : १ एप्रिल २०१५ ला चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी झाली. आता या दारूबंदीला तीन वर्षे लोटली. मात्र अनेक गावातील अवैध दारूविक्रीच्या कारवायांवरून जिल्ह्यात खरोखरच दारूबंदी आहे का, प्रश्न आपुसकच विचारला जाते. दारूबंदीच्या तीन वर्षात सहा लाख ६२ हजार ७२९ लिटर देशी-विदेशी आणि गावठी दारू पोलिसांनी जप्त केली. या दारूची किमंत ५१ कोटी ८२ लाख २७ हजार ८७६ एवढी आहे. दारू, वाहने आणि इतर साहित्य मिळून तीन वर्षात पोलिसांनी १२१ कोटी १७ लाख ८३ हजार ९६५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यात अनेकांना अटक झाली असली तरू खून, मारहाण, दंगा, चोरी अशा गुन्हेगारीत कमालीची घट झाल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकर, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक हेमराज राजपुत यांनी पत्रकार परिषदेत दिली.१ एप्रिल २०१५ रोजी जिल्ह्यात दारूबंदी झाल्यानंतर १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१७ या पहिल्या दोन वर्षात दारूसाठा जप्तीचे प्रमाण कमी होते. पहिल्या वर्षी एक लाख ५० हजार ९४५ लिटर तर दुसऱ्या वर्षी एक लाख ८३ हजार ४६६ लिटर दारू जप्त करण्यात आली होती. तिसºया वर्षी तीन लाख २८ हजार ३१८ लिटर दारू पोलिसांनी जप्त केली. या तीन वर्षात २२ हजार ३३६ प्रकरणात २५ हजार १३५ आरोपींना पोलिसांनी अटक केली. तीन हजार ६२३ दुचाकी व १ हजार १५७ चारचाकी वाहने जप्त केली. नऊ कोटी १२ लाख १४ हजार ८९ रुपयाचे इतर साहित्यही जप्त करण्यात आल्याचे पोलीस अधीक्षकांनी पत्रकार परिषदेत सांगितले.पोलिसांकडून दारूविक्रेत्यांवर कारवाई होत असली जिल्ह्यात दारूविक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे. पोलीस आणि दारू विक्रेत्यांचे आर्थिक संबंध सुद्धा या काळात उघड झाले. तर काही दिवसांपुर्वीच पोलिसांच्या गाडीचा चंद्रपुरात दारू आणण्यासाठी उपयोग करण्यात आला होता, हे सुद्धा उघड झाले. दारूविक्रेत्यांनी पोलिसांवर प्राणघातक हल्ला केल्याच्या घटनाही जिल्ह्यात घडल्या. दरम्यान मद्याला पर्याय म्हणून अमली पदार्थ सुद्धा चंद्रपुरात मोठ्या प्रमाणात सेवन केले जात आहे. गांजा, चरस आणि गर्दच्या विळख्यात विद्यार्थी सापडले आहेत.अमली पदार्थाचा वापरदारूबंदीनंतर जिल्ह्यात अंमली पदार्थांची विक्री वाढली आहे. महाविद्यालयीन विद्यार्थी अमली पदार्थांच्या आहारी गेल्याचे अनेकदा समोर आले आहे. मागील ३२ महिन्यात तब्बल ३१३ किलो गांजा पोलिसांनी जप्त केला. १८ प्रकरणात २८ आरोपींना अटक करण्यात आली. ब्राऊन शुगरसारखे अंमली पदार्थसुद्धा चंद्रपूर शहरात पोलिसांनी पकडले असून आतापर्यंत ८८ मिलीग्रॅम गर्द जप्त केले. गुंगीचे औषध असलेली डोडा भुकटीसुद्धा पोलिसांनी पकडली.वहानगावने उडविली होती प्रशासनाची झोपअवैध दारूविक्रीला कंटाळून चिमूर तालुक्यातील वहानगाव वासीयांनी आम्हाला दारूविक्रीची परवनागी द्यावी, अन्यथा ग्रामपंचायतमध्ये खुलेआम दारूविक्री करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतरही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने ग्रामसभा घेवून ग्रामपंचायतीने दारूविक्रीचे खुलेआम दुकान लावण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांचा प्रयत्न हाणून पाडला. उपसरपंच प्रशांत कोल्हे याला हद्दपार करण्यात आले. तेव्हा प्रशासनाविरूद्ध गावकरी उभे ठाकले होते.