२३ बाधितांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या ६९ हजार ३८८ वर पोहोचली आहे. सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या ५२ हजार ४४७ झाली आहे. सध्या १५ हजार ८८२ बाधितांवर उपचार सुरू आहेत. ४ लाख ४ हजार ८४७ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ३ लाख ३० हजार ९७६ नमुने निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १०५९ बाधितांचे मृत्यू झाले. यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील ९७७ तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली ३०, यवतमाळ ३६, भंडारा १०, गोंदिया एक आणि वर्धा एक, नागपूर येथील दोन बाधिताचा समावेश आहे. नागरिकांनी कोरोना पूर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर निघावे. मास्क वापरावा, वारंवार हात धुवावे व सुरक्षित अंतर राखणे. स्वत:ची काळजी घ्यावी तसेच ४५ वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.
जिल्ह्यातील मृतक
आज मृत झालेल्यामध्ये चंद्रपुरातील हनुमान नगर तुकूम येथील ७० वर्षीय पुरुष, ऊर्जानगर येथील ४० वर्षीय पुरुष, रामनगर परिसरातील ६५ वर्षीय पुरुष, घुग्घूस येथील ६० वर्षीय पुरुष, ४५, ५८, ६२ वर्षीय पुरुष, ६५, ५५ व ७२ वर्षीय महिला, मारेगाव चंद्रपूर येथील ४५ वर्षीय महिला, राजुरा तालुक्यातील ४० वर्षीय महिला. वरोरा तालुक्यातील ४५ वर्षीय पुरुष, बल्लारपूर तालुक्यातील ६० वर्षीय महिला, चिमूर तालुक्यातील ३४ वर्षीय पुरुष, सावली तालुक्यातील व्याहाड येथील ७४ वर्षीय पुरुष, ब्रह्मपुरी तालुक्यातील ५३, ५६ व ८१ वर्षीय पुरुष व ३४ वर्षीय महिला, नागभीड तालुक्यातील ५५ वर्षीय पुरुष, गोंडपिपरी तालुक्यातील ४२ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
तालुुकानिहाय पॉझिटिव्ह
चंद्रपूर ३९२
चंद्रपूर तालुका ८१
बल्लारपूर ७२
भद्रावती १४९
ब्रह्मपुरी ५२
नागभीड २२
सिंदेवाही ३८
मूल ३२
सावली ३१
पोंभूर्णा १८
गोंडपिपरी ६५
राजूरा ११७
चिमूर ५५
वरोरा १६१
कोरपना १४५
जिवती ०१
अन्य १८