शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
6
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
7
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
8
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
9
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
10
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
11
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
12
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
13
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
14
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
15
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
16
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
17
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
18
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
19
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
20
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप

५२०१ युवक-युवतींना मिळाला रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 10:52 PM

प्रचंड उत्साह व जिज्ञासेवर विश्वास ठेवणाºया सुमारे ४० हजार युवकांच्या उपस्थितीत बामणी येथील युथ एम्पॉवरमेंट समिटचा सोमवारी समारोप झाला. ३८ हजार युवकांनी अवघ्या पाच दिवसात आॅनलाईन अर्ज केल्यानंतर त्यांच्यापैकी पाच २०१ विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये निवड झाल्याचे पत्र देण्यात आले. केवळ जिल्ह्यासाठी राबविण्यात आलेल्या युथ एम्पॉवरमेंट समिटमुळे पाच हजार युवकांच्या हाताला रोजगार मिळाला आहे.

ठळक मुद्देयुथ एम्पॉवरमेंट समिटचा समारोप : दुसऱ्या दिवशी १८ हजार विद्यार्थी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : प्रचंड उत्साह व जिज्ञासेवर विश्वास ठेवणाºया सुमारे ४० हजार युवकांच्या उपस्थितीत बामणी येथील युथ एम्पॉवरमेंट समिटचा सोमवारी समारोप झाला. ३८ हजार युवकांनी अवघ्या पाच दिवसात आॅनलाईन अर्ज केल्यानंतर त्यांच्यापैकी पाच २०१ विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये निवड झाल्याचे पत्र देण्यात आले. केवळ जिल्ह्यासाठी राबविण्यात आलेल्या युथ एम्पॉवरमेंट समिटमुळे पाच हजार युवकांच्या हाताला रोजगार मिळाला आहे.राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने जिल्हा प्रशासन, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालय, फॉर्च्यून फाऊंडेशन आणि जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या संयुक्त विद्यमाने बल्लारपूर इन्स्टिट्युट आॅफ टेक्नॉलॉजी येथे रविवारी रोजगार महामेळावा सुरू झाला होता.दुसºया दिवशी नोंदणी केलेल्या १८ हजार पैकी दोन हजार ४२३ विद्यार्थ्यांना सोमवारी विविध कंपन्यांनी आपल्या आस्थापनांकरिता निवड केली. महाराष्ट्रातील ख्यातनाम अशा ५३ प्रतिष्ठित कंपन्यांना या ठिकाणी आयोजकांनी पाचारण केले होते.मुंबई, पुणे, औरंगाबाद येथील कंपन्यांच्या आस्थापना बल्लारपूर येथे येऊन मुलांच्या मुलाखती घेतल्याने विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला. अनेकांसाठी ही सुरुवात होती तर अनेकांना यावेळी संधीची अपेक्षा होती.३८ हजार विद्यार्थ्यांनी आॅनलाईन अर्ज केले होते. त्यापैकी पाच हजार विद्यार्र्थ्यांंना दोन दिवसात संधी भेटणे हीदेखील मोठी उपलब्धी ठरली. आजच्या निवडीमध्येदेखील मुलींची संख्या प्रचंड होती.युवकांकडून विविध व्यवसायांची चौकशीग्रामीण भागातील गोंडपिंपरी, जिवती, कोरपना राजुरा, बल्लारपूर, सावली, ब्रह्मपुरी, सिंदेवाही अशा अनेक तालुक्यातील ग्रामीण भागातील मुलांनी या ठिकाणी वेगवेगळ्या कंपनीच्या मुलाखतीची संधी मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले.जिल्हा प्रशासनाच्या वेगवेगळ्या विभागामार्फत या ठिकाणी स्टॉल लावण्यात आले होते. तसेच मुद्रा बँक लोन वितरण संदर्भात अनेक बँकांनी या ठिकाणी आपले स्टॉल लावले होते. या स्टॉलवर देखील मोठ्या प्रमाणात युवकांनी रोजगाराभिमुख विविध व्यवसायाची चौकशी केली.१९० युवकांना मुद्रा कर्ज मंजूरजिल्हा अग्रणी बँकेच्या समन्वयकांनी दिलेल्या माहितीनुसार दोन दिवसात बामणी मैदानावरून 190 युवकांना मुद्रा बँक योजनेतून कर्ज उपलब्ध करून दिल्या गेले. या मेळाव्यामध्ये आयोजित करण्यात आलेले दर्जेदार मार्गदर्शन हेदेखील युवकांसाठी एक पर्वणी ठरली. मेळाव्याचे दुसºया दिवशी मान्यवरांचे मार्गदर्शन ऐकण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली. मुलाखतीपूर्वी चाणक्य मंडळातर्फे मार्गदर्शन करण्यात आले. याशिवाय सोमवार दिवसभरात विविध विषयांवर तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.