चंद्रपूर : जिल्ह्यात मागील २४ तासांत ९७२ जणांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर ५५३ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली असून ११ जणांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या ७९ हजार ७०३ वर पोहोचली आहे. तसेच सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या ७० हजार ९८७ झाली आहे. सध्या ७ हजार ३९१ बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ४ लाख ४७ हजार ७९ नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी ३ लाख ६४ हजार ४६५ नमुने निगेटिव्ह आले आहेत.
बाॅक्स
गुरुवारचे मृत्यू
चंद्रपूर शहरातील अंचलेश्वर गेट परिसरातील ७० वर्षीय पुरुष, ७३ वर्षीय पुरुष, भिवापूर वाॅर्ड येथील २० वर्षीय पुरुष, घुगुस येथील ५२ वर्षीय पुरुष, बल्लारपूर तालुक्यातील ४५ वर्षीय पुरुष, भद्रावती तालुक्यातील ७६ वर्षीय पुरुष, माजरी येथील ६५ वर्षीय महिला, मूल तालुक्यातील ४५ वर्षीय पुरुष, राजुरा तालुक्यातील ४० वर्षीय पुरुष, ब्रह्मपुरी तालुक्यातील खेड येथील ४० वर्षीय महिला, पळसगाव येथील 55 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
बाॅक्स
आतापर्यंतू १३२५ जणांचा मृत्यू
जिल्ह्यात आतापर्यंत १ हजार ३२५ बाधितांचा मृत्यू झाला असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील १ हजार २२८, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली ३५, यवतमाळ ४४, भंडारा ११, वर्धा एक, गोंदिया दोन आणि नागपूर येथील दोन बाधिताचा समावेश आहे.
असे आहेत बाधित
चंद्रपूर पालिका क्षेत्र २०७
चंद्रपूर तालुका ४६
बल्लारपूर ३२
भद्रावती ४३
ब्रह्मपुरी ३३
नागभीड १३
सिंदेवाही २०
मूल २६
सावली ०८
पोंभूर्णा ११
गोंडपिपरी ०७
राजुरा ३१
चिमूर ११
वरोरा २२
कोरपना ३३
जिवती ०३
इतर ०७