नरेश पुगलिया : कच्चा माल बांबूची समस्या न्यायालयात मांडणारबल्लारपूर: बल्लारपूर पेपर मिल सध्या आर्थिक संकटातून जात आहे. तीन महिन्यांच्या पगार अडला आहे. कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात जाऊ नये याकरिता व्यवस्थापनाने थकीत वार्षिक बोनसमधील ६० टक्के रक्कम देण्याचे ठरवून हे २ कोटी ४० रुपये रक्कम गुरूवारी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे.नियमित कर्मचारी रोजंदारी आणि अ श्रेणी ठेकेदारी कर्मचारी यांना प्रत्येकी १० हजार रुपये तर त्यानंतरच्या ठेकेदारी कर्मचाऱ्यांना पाच हजार रुपये मिळणार आहेत. यामुळे आर्थिक संकटात सापडून असलेल्या पेपर मिलच्या कर्मचाऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे. वार्षिक बोनसची बाकी रक्कम नोव्हेंबर महिन्यात दिलीजाईल. आष्टी पेपर मिल कर्मचाऱ्यांनाही याच पद्धतीने बोनसची रक्कम दिली जाणार आहे. अशी माहिती बल्लारपूर पेपर मिल मजदूर सभेचे अध्यक्ष नरेश पुगलिया यांनी आज येथे दिली. बिल्ट पेपर मिल उद्योगाच उपाध्यक्ष रणजी अब्राहम आणि स्थानिय मुख्य महाव्यवस्थापक व्यंकटेशरलू यांच्याशी पुगलिया यांनी चर्चा केली. बोनसची ही रक्कम देण्याचे ठरले. जे के पेपर समूह ही मिल विकत घेण्याविषयी विलंब करीत आहे. त्यावर उपाय म्हणून काही अन्य उद्योगांनी यात तात्पुरती गुंतवणूक करणञयाची तयारी दर्शविली आअहे. त्या मार्गाने आर्थिक व्यवस्था करुन ही मिल अविरत चालू ठेवली जाणार आहे. त्यातूनच अडलेल्या पगाराचा मुद्दा सुटणार आहे.खरे संकट कच्चा माल बांबू वन विभागाकडून न मिळणे हे आहे. यात मुख्य अडथळा राज्याचे वनमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, असा आरोप करीत दिवाळीनंतर पेपर मिल मजदूर सभा, वन विभागाच्या विरोधात न्यायालयात जाणार आहे, असे पुगलिया यांनी सांगितले. बांबू लिलावात पेपर मिल ही एकच पार्टी बोलीकरिता आली. त्याचा दोष या पेपर मिलचा कसा व त्याची वन विभागाकडून अडवणूक का, हा आपला शासनाला प्रश्न आहे, असे म्हणत पेपर मिलवर प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष १० हजार लोकांचा रोजगार अवलंबून आहे. यामुळे ही मिल बंद पडू नये, याकरिता प्रयत्न आहे, असे ते म्हणाले. वनजमिनीवर अनेक वर्षांपासून राहात असलेल्या, शेतीकरिता असणाऱ्या गरिबांना हाकलून लावण्याचा शासनाचा प्रयत्न निंदनीय आहे, असे म्हणत, जिल्ह्यातील उद्योग बंद होत आहेत. ते चालू होतील व नवीन उद्योग या जिल्ह्यात कसे येतील, याकडे पालकमंत्र्यांनी लक्ष द्यावे, असा सल्लाही त्यांनी पत्रपरिषदेतून सरकारला दिला. या पत्रपरिषदेत महासचिव वसंत मांढरे, नायर, रामदास वागदरकर आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)थकीत वेतनासाठी निदर्शनेपगार तीन महिन्यापासून अडला आहे. सुपर व वार्षिक बोनस नाही. या रागापोटी बुधवारला पेपर मिल कर्मचाऱ्यांनी पेपर मिलच्या थापर गेट पुढे जमा होऊन थकीत रकमेची मागणी केली होती.
बल्लारपूर पेपर मिल कर्मचाऱ्यांना ६० टक्के दिवाळी बोनस
By admin | Published: October 28, 2016 12:53 AM