हरविलेले मोबाईल : पोलिसांना यशचंद्रपूर : हरविलेल्या वस्तु परत मिळेलच याची शास्वती कमी असते. त्यातही मोबाईल सारख्या वस्तू असेल तर त्या पुन्हा सापडतील, हे अश्यकच वाटते. मात्र जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनात गठित विशेष कृती दलाच्या पथकाने हरविले तब्बल ६५ मोबाईल हस्तगत करून मुळ मालकांना ते परत केले आहे. मोबाईल हरविल्याच्या व चोरल्याच्या अनेक तक्रारी विविध पोलीस ठाण्यात दाखल होत्या. याची दखल घेत पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांनी एक विशेष कृती दल तयार करुन पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या मिसींग मोबाईल शोधण्याची मोहिम आखली. नवनियुक्त पोलीस शिपायांचे गट तयार करुन त्यांच्या सोबत सायबर सेल व स्थानिक गुन्हे शाखा यांची एक एक चमू देऊन त्यांना हरविलेल्या मोबाईलचा शोध घेण्याचे टास्क देण्यात आले. सायबर सेल चंद्रपूरच्या मदतीने हरविलेल्या मोबाईलचे लोकेशन ट्रेस करत तात्काळ तिथे स्थानिक गुन्हे शाखेची चमू रवाना केली. त्यामुळे हरविलेले तब्बल ६५ मोबाईल परत मिळविण्यात पोलिसांना यश आले.पुन्हा मिळून आलेले मिसिंग मोबाईल नागपूर परीक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक रवींद्र कदम यांचे हस्ते पोलीस मुख्यालयात आयोजित एका कार्यक्रमात मूळ मालकांना सुपूर्द करण्यात आले. हरविलेल्या मोबाईल पैकी बरेच मोबाईल २० ते २५ हजार रुपयापर्यंत किमंतीचे होते. (स्थानिक प्रतिनिधी)
६५ मोबाईल सापडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2016 1:01 AM