लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : सध्या घातक व्यसनांच्या आहारी युवक जात असून त्यामुळे अनेकजण आत्महत्येसारखा भयंकर मार्ग स्वीकारताना दिसतात. युवकांनी चांगले शिक्षण घेत उन्नती करावी. घातक व्यसनांच्या आहारी जाऊन जीवन संपवू नये, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी शेखर देशमुख यांनी केले.पाचगाव येथे ग्रामगीता तत्त्वज्ञान विचारमंथन तथा प्रचारक मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी ग्रामवासीयांच्या वतीने ६५ प्रज्ञावंत ग्रामस्थांचा ग्रामगीता व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. श्रीगुरूदेव सेवा मंडळातर्फे आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर होते. उद्घाटक म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी शेखर देशमुख, प्रमुख अतिथी म्हणून तालुकाध्यक्ष अॅड. राजेंद्र जेनेकर, समाजसेवक डॉ. गिरीधर काळे, सामाजिक कार्यकर्ते संजय पोडे, कवी सतीश लोंढे, पं.स.सदस्य सुनंदा डोंगे, तुंबडे महाराज, खुशाल गोहोकर, जहीर खान, लटारु मत्ते, उपसरपंच गोपाल जंबुलवार, प्रचार प्रमुख नानाजी डोंगे, प्रा. प्रकाश उरकुंडे, मोहनदास मेश्राम आदींची उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या सुरुवातीला आदिवासी लोकनृत्य, पदावली भजन करत आदिवासी प्रार्थनास्थळ, मुस्लीम समाजस्थळ, हनुमान मंदिराला भेट देत प्रभातफेरी काढण्यात आली. यावेळी उपस्थितांनी ग्रामगीता अध्यायानुरूप वेगवेगळ्या विषयांवर विचार प्रकट केले. प्रास्तविक सुधाकर गेडेकर यांनी केले.त्यानंतर २५ व्या झाडीबोली साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष बंडोपंत बोढेकर, शेखर देशमुख, डॉ. गिरिधर काळे, संजय पोडे यांचा तसेच गावातील ६५ प्रज्ञावंत मंडळी व सेवानिवृत्त कर्मचाºयांचा ग्रामवासियांचे वतीने ग्रामगीता व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन रामकृष्ण चिडे गुरुजी तर आभार सचिव मारोती मादनेलवार यांनी मानले.
पाचगाव येथे ६५ प्रज्ञावंत ग्रामस्थांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 12:34 AM
सध्या घातक व्यसनांच्या आहारी युवक जात असून त्यामुळे अनेकजण आत्महत्येसारखा भयंकर मार्ग स्वीकारताना दिसतात. युवकांनी चांगले शिक्षण घेत उन्नती करावी. घातक व्यसनांच्या आहारी जाऊन जीवन संपवू नये, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी शेखर देशमुख यांनी केले.
ठळक मुद्देग्रामगीता मेळावा : अनेकांची उपस्थिती