लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर: होमगार्ड म्हणजेच गृहरक्षक दलात राज्यात एकूण ९ हजार ७०० पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. चंद्रपुरात रिक्त असलेल्या ९१ पदांसाठी सहा हजार २०० उमेदवारांचे ऑनलाइन अर्ज आले होते. उत्स्फूर्त प्रतिसादामुळे एका जागेसाठी किमान ६८ उमेदवार रांगेत आहेत. जिल्ह्यातील होमगार्डची शारीरिक क्षमता चाचणी पार पडली आहे. आता केवळ चारित्र पडताळणी व वैद्यकीय पडताळणी शिल्लक आहे. त्यानंतर हे होमगार्डच्या सेवेसाठी पात्र ठरणार आहेत.
कायदा सुव्यवस्था राखण्यात पोलिसांना मदत करण्यासाठी होमगार्ड संकल्पना सुरू करण्यात आली. पोलिसांना मदत करण्याबरोबर आपत्कालीन स्थितीत होमगार्ड उपयुक्त ठरत असल्याने पोलिसांना चांगलीच मदत होत आहे. पोलिस भरतीत अपयशी ठरलेले अनेक तरुण गृहरक्षक दलात काम करतात. मागील महिन्यात ९१ होमागार्डच्या पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली. त्यासाठी तब्बल सहा हजार २०० अर्ज आले.
कोणती कागदपत्रे आवश्यक? शैक्षणिक कागदपत्रे, वय, जात पुराव्याचे संच, आयकार्ड आदी कागदपत्रे गरजेची होती. शारीरिक क्षमता चाचणी पूर्ण झाली असून केवळ चारित्र पडताळणी, वैद्यकीय पडताळणी शिल्लक आहे.
केवळ चारित्र पडताळणी शिल्लक होमगार्डची शारीरिक क्षमता चाचणी २२ ते २४ ऑगस्ट या कालावधीत चंद्रपुरात पार पडली. आता केवळ चारित्र व वैद्यकीय पडताळणी शिल्लक आहे. लवकरच ते सेवेत रुजू होणार आहेत.
महिलांसाठी किती जागा आरक्षित? गृहरक्षक दलात राज्यात एकूण ९ हजार ७०० पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. चंद्रपूर जिल्ह्यात ९१ जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात आली. यात महिलांसाठी ४३ जागा राखीव होत्या.
जिल्ह्यात होमगार्डच्या ९१ जागा गृहरक्षक दलात राज्यात एकूण ९ हजार ७०० पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. चंद्रपूर जिल्ह्यात ९१ जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात आली. यात महिलांसाठी ४३ जागा राखीव होत्या.
सहा हजार २०० अर्ज चंद्रपूर जिल्ह्यात होमगार्डच्या ९१ जागांसाठी ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले होते. जिल्ह्याभरातून तब्बल सहा हजार दोनशे अर्ज आले. २२ व २४ ऑगस्ट यादरम्यान त्यांची शारीरिक चाचणीही पार पडली.