जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या २३ हजार ८७३ वर पोहोचली आहे. सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या २३ हजार ४० झाली आहे. सध्या ४३४ बाधितांवर उपचार सुरू आहेत. गुरुवारपर्यंत दोन लाख १८ हजार २८४ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी एक लाख ९२ हजार ३३१ नमुने निगेटिव्ह आले आहेत. मागील २४ तासांत १४ जणांनी कोरोनावर मात केल्याने रुग्णालयातून त्यांना सुटी देण्यात आली. जिल्ह्यात ३९९ बाधितांचे मृत्यू झाले. यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील ३६०, तेलंगणा, भंडारा व बुलडाणा प्रत्येकी एक, गडचिरोली १८, यवतमाळ १६ आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.
चंद्रपूर व वरोरात सर्वाधिक रुग्ण
आज बाधित आढळलेल्या ७० रुग्णांमध्ये चंद्रपूर मनपा क्षेत्रातील २०, चंद्रपूर तालुका एक, बल्लारपूर सहा, सिंदेवाही दोन, मूल १०, राजुरा तीन, वरोरा २६, कोरपना एक व इतर ठिकाणच्या एका रुग्णाचा समावेश आहे.
१,७२७ जणांनी घेतली लस
गुरुवारी १,८०० जणांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्याचे उद्दिष्ट होते. त्यापैकी १,७२७ जणांनी (९६ टक्के) लस घेतली. यामध्ये पहिला डोस घेणारे आरोग्य कर्मचारी - १५६, दुसरा डोस घेणारे - ६०२, फंटलाइन वर्कर ८९ तर ४५ ते ६० वयोगटातील ८८० जणांचा समावेश आहे.
कॉन्ट्रक्ट ट्रेसिंग अजूनही १६.२८ टक्क्यांवरच
चंद्रपूर मनपा अंतर्गत ६० हजार २२५ व ग्रामीण भागात ९२ हजार ८६९ असे एकूण एक लाख ५३ हजार ९४ जण अति जोखमीच्या गटात येतात. कोरोनाचे रुग्ण दरदिवशी वाढतच आहेत. मात्र, कॉन्ट्रक्ट ट्रेसिंग १६.२८ टक्क्यांवरच थांबले. हे प्रमाण २० टक्क्यांहून अधिक ठेवण्याचे शासनाचे निर्देश आहेत.