चंद्रपूर : औद्योगिक जिल्हा म्हणून ओळख असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात वाहनांची संख्याही अधिक आहे. त्यामुळे वाहनांच्या फॅन्सी नंबरसाठीही बऱ्याचवेळा चढाओढ बघायला मिळते. दुसऱ्यांच्या तुलनेमध्ये आपल्या वाहनाचा नंबर वेगळा दिसावा यासाठी सिंगल नंबर आणि ट्रिपल नंबरकडे वाहनधारक पैसे मोजून क्रमांक मिळवित आहे. यातुने उपप्रादेशिक परिवहन विभागाला बऱ्यापैकी महसूल मिळत आहे.
काही वाहनधारक लक्की क्रमांक म्हणून वाहनालाही तोच नंबर मिळविण्याचा प्रयत्न करतात. तर काही जण आपल्याकडील असलेल्या प्रत्येक वाहनांना एकच क्रमांक असावा असा त्यांचा प्रयत्न असतो. काही जण जन्म तारीखेचे वर्षाची बेरीज करून तो नंबर घेतात. मागील काही वर्षांमध्ये असा नंबर घेण्याचा कल मोठ्या प्रमाणात वाढला आहे. विशेषत: सामान्य नागरिक जो नंबर मिळेल तो घेऊन मोकळे होत आहे. व्यावसायिक, राजकीय नागरिक विशेष नंबरसाठी प्रयत्नशील असल्याचे बघायला मिळते. २०१९ मध्ये एका ग्राहकांने विशेष नंबर मिळविण्यासाठी तब्बल ७० हजार रुपये मोजल्याचेही उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून माहिती मिळाली आहे. यामध्ये ४४, २२, ९९९, ७७७, ७८६, ८८८ या क्रमांकानाही बरीच मागणी आहे.
नवीन वाहनांची खरेदी केल्यानंतर आवडीचा नंबर मिळविण्यासाठी बहुतांश ग्राहक उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे धाव घेतात. आपल्या आवडीचा नंबर मिळावा यासाठी ते वाहनाची पाॅसिंग सुद्धा थांबवून ठेवत असल्याचा प्रकार अनेकवेळा घडतात. आपल्याला आवडेल तो क्रमांक नसेल तर चालू सिरीज संकल्यानंतर येणाऱ्या दुसऱ्या सिरीजमध्ये नंबर मिळावा यासाठी अनेकांची धडपड असते. ०००२ ,९०९०, ८१८१,३६३६, ९०० असा अनेक प्रकारचे नंबरसाठी ग्राहक पैसे मोजत असल्याची माहिती मिळाली आहे.
कोट
शासनस्तरावरून फ्रन्सी क्रमांकासाठी दर ठरवून दिले आहे. ज्या क्रमांकासाठी पैसे भरले जातात तो क्रमांक त्या वाहनधारकांना एक महिन्यात दिला जातो. यातून शासनाला महसूल मिळण्यास मदत होत असून संबंधित वाहन धारकांनाही आपल्या पसंतीची नंबर मिळत असल्याचे समाधानी होतो. वाहनधारकांनी शासनाने ठरवून दिलेले दर भरून आपल्या परंतीचा नंबर मिळवावा.
-दीपक जाधव
सहाय्यक
प्रादेशिक परिवहन अधिकारी, चंद्रपूर००००
आरटीओंची कमाई
२०१९
५६ लाख
२०२०
२३ लाख