फारूख शेख ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिवती तालुक्यातील पाटण येथे शौचालय चोरीला गेल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एक अशीच घटना उघडकीस आली आहे. तालुक्यातील धनकदेवी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गावातही शौचालय चोरीला गेल्याची तक्रार कोरपना पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.तालुक्यातील धनकदेवी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या कारगाव (खु), मरकागोंदी, धनकदेवी, पाटागुडा, जांभूळधरा व कारगाव (बु) येथील तब्बल ७२ शौचालय बांधकामात भ्रष्टाचार झाला आहे. शासनातर्फे प्रति लाभार्थी १२ हजार रुपये अनुदान देण्यात आले. परंतु सचिव काशिनाथ कांबळे व तत्कालीन सरपंच सुरेश कोडापे यांनी रक्कम परस्पर हडप केली व शौचालय बांधकाम पूर्ण झाले, असे ग्रामपंचायत रेकॉर्डवर नमूद केले आहे. सन २०१४-१५ व २०१६ या कालावधीत सदर ७२ शौचालय बांधकामासाठी निधी आला होता, असे पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.धनकदेवी ग्रामपंचायत अंतर्गत बांधण्यात आलेल्या ७२ शौचालयात भ्रष्टाचार झाला असून सरपंच व सचिव यांनी मलिदा लाटला आहे. त्यांना याविषयी वारंवार विचारणा केली. परंतु त्यांनी प्रतिसाद न दिल्याने आम्हाला अखेर पोलीस ठाण्यात तक्रार द्यावी लागली.- प्रभाकर वेलादी, उपसरपंच, ग्रामपंचायत, धनकदेवीगावात झालेल्या शौचालय बांधकामाची चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्यात यावे.- चंदू वाघुजी उईके, गाव पाटील.
चंद्रपूर जिल्ह्याच्या जिवती तालुक्यात पुन्हा ७२ शौचालयांची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 11:57 AM
जिवती तालुक्यातील पाटण येथे शौचालय चोरीला गेल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एक अशीच घटना उघडकीस आली आहे.
ठळक मुद्देअनुदान लाटलेनागरिकांची पोलिसात धाव