शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

७३४ ग्रामपंचायतींना मिळाले जलस्रोतांचे ग्रीन कार्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 12:45 AM

पाणी गुणवत्ता व स्वच्छता संनियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे केलेल्या जलस्त्रोत तपासणी अहवालानुसार जिल्ह्यातील ९३ गावांतील पिण्याचे पाणी आरोग्य घातक असल्याचे स्पष्ट झाले. तर ७३४ गावांचे पाणी पोषक असल्याने ही गावे ग्रीन कार्डसाठी पात्र ठरली आहेत.

ठळक मुद्देजि. प. आरोग्य विभागाचा अहवाल : ९३ ग्रामपंचायतींचे जलस्रोत घातक

राजेश मडावी।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : पाणी गुणवत्ता व स्वच्छता संनियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे केलेल्या जलस्त्रोत तपासणी अहवालानुसार जिल्ह्यातील ९३ गावांतील पिण्याचे पाणी आरोग्य घातक असल्याचे स्पष्ट झाले. तर ७३४ गावांचे पाणी पोषक असल्याने ही गावे ग्रीन कार्डसाठी पात्र ठरली आहेत.जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून दरवर्षी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गावांतील जलस्त्रोतांची वर्षातून दोनदा (एप्रिल व आॅक्टोबर) तपासणी करून उपायोजना सुचविण्याचा राज्य सरकारकडून आदेश आहे. यानुसार जिल्ह्यातील ८२७ गावांतील स्त्रोताची आॅक्टोबर २०१८ रोजी तपासणी पूर्ण झाली. एप्रिल २०१९ रोजी होणारी तपासणी लवकरच सुरू केल्या जाणार आहे. जलस्त्रोत शुद्धीकरण आहेत काय, उपाययोजना व त्रुटी कोणत्या याची तपासणी करून जलस्त्रोतांची जोखीम ठरविली जाते. या जोखमीचे तीन गटात वर्गीकरण केल्या जाते. सौम्य जोखीम असलेल्या गावांना ग्रीन कार्ड दिला जातो. हे कार्ड मिळविण्यासाठी सदर ग्रामपंचायतीला जलस्त्रोतांची उत्तम काळजी घेऊन नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध करून द्यावे लागते. ५ ते २५ गुण मिळविणाºया ग्रामपंचायतीच याकरिता पात्र ठरतात. ३० ते ६५ गुण मिळविणारी गावे मध्यम जोखीम या गटात येतात. अशा ग्रामपंचायतींना पिवळा कार्ड मिळतो. सदर गावातील पाणी नागरिकांच्या आरोग्याला घातक असते. अशा पाण्यातून जलजन्य आजार पसरण्याचा धोका असतो. आॅक्टोबर २०१८ रोजी झालेल्या पाहणीत ९३ गावांचे पाणी पिण्यायोग्य नसल्याने आरोग्य विभागाने ग्रामपंचायतींना पिवळे कार्ड दिले.हे कार्ड मिळाल्यानंतर ग्रामपंचायतीने एक महिन्याच्या आत उपाययोजना करून संबंधित अहवाल जि. प. आरोग्य विभागाकडे पाठवावा लागतो. मात्र, पदाधिकारी व ग्रामसेवकांनी उपाययोजनांकडे दुर्लक्ष केले. परिणामी, आरोग्याला घातक असलेले पाणी गावकऱ्यांना आजही प्यावे लागत आहे.अशी होते तपासणीजिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून दिलेल्या प्रपत्रानुसार स्थानिक जलसुरक्षक व आरोग्य सेवकामार्फत गावातील जलस्त्रोतांची माहिती घेतली जाते. ही माहिती ग्रीन, यलो आणि रेड या प्रपत्रात दिलेल्या निकषानुसार भरली जाते. सदर प्रपत्र जिल्हा परिषद आरोग्य विभागाला प्राप्त झाल्यानंतर मूल्यांकन होते. गावांतील जलस्त्रोतांच्या त्रुटी लक्षात घेऊन मध्यम जोखमीचे येलो कार्ड संबंधीत संवर्ग विकास अधिकारी, पाणीपुरवठा अभियंता व तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या स्वाक्षरी दिल्या जाते. एक महिण्याच्या आत कोणत्या उपाययोजना कराव्यात, याबाबतही सूचना दिल्या जातात.१० ग्रामपंचायतींनीच केली सुधारणायेलो कार्ड प्रवर्गात असणाºया गावांपैकी मार्च २०१९ पर्यंत केवळ १० गावांनीच जलस्त्रोतांमध्ये सुधारणा घडवून आणली. गावकºयांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे, यासाठी आरोग्य विभागाने सुचविलेल्या त्रुटींची पूर्तता केली. यामध्ये मुल तालुक्यातील जानाळा, गांगलवाडी (टेकाडी), बेंबाळ, बाबराळा, नागभीड तालुक्यातील पुसाडमेंढा, पेंढरी तसेच जिवती तालुक्यातील चिखली खुर्द, नंदप्पा, मकरागोंदी गावांचा समावेश आहे.तपासणीतून पुढे आलेल्या त्रुटीजिल्ह्यातील बहुतेक ग्रामपंचायतींमध्ये हातपंप व विहिरींना प्लॅटफार्म बनविल्या जात नाही. पाण्याची सतत गळती सुरू राहते. जलस्त्रोतांना लागूनच शौचालये आहेत. जलस्त्रोताजवळ कपडे धुतल्या जातात. पाण्याचे नमुने दर तीन महिन्यातून एकदा तपासल्या जात नाही. नळयोजनेच्या जलकुंभाची स्वच्छता होत नाही. जंतुनाशक पावडरचा आवश्यकतेनुसार साठा केला जात नाही, आदी अनेक त्रुटी या तपासणीतून पुढे आल्या आहेत.

टॅग्स :Waterपाणी