लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : तालुक्यातील महादवाडी येथील पाच महिला केवाडा जंगलात कुड्याची फुले आणायला गेल्या असता, अचानक वाघाने महिलांवर हल्ला चढविला. यामध्ये एक महिला जागीच ठार झाली, तर दोन महिला गंभीर जखमी झाल्या. ही घटना रविवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेनंतर खा. अशोक नेते व भाजप पदाधिकाऱ्यांनी गावाला भेट देऊन मृतकाच्या कुटूंबाला तत्काळ ७५ हजार रूपयाची आर्थिक मदत दिली. भेटीदरम्यान खासदार अशोक नेते, माजी आ. अतुल देशकर, जिल्हा परिषद सदस्य संजय गजपुरे, गणवीर, स्वप्नील वरगंटे, कमलाकर सिद्धमशेट्टीवार, जि. प. सदस्य नागराज गेडाम, राजू बोरकर, लोकनाथ बोरकर, अविनाश पाल उपस्थित होते. यावेळी खा. अशोक नेते यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून घटनेची माहिती जाणून घेतली. त्यानंतर मृतक देवांगना देविदास निकेसर (३५) रा. महादवाडी यांच्या कुटूंबियाला तत्काळ ७५ हजार रूपयाची मदत केली. त्यांना आणखी ७ लाखांची मदत दिली जाणार आहे.वाघाचा लवकरच बंदोबस्त : सुधीर मुनगंटीवारमहादवाडी येथे घडलेल्या घटनेनंतर किन्ही येथील नागरिकांच्या शिष्टमंडळाने वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची चंद्रपूर येथे भेट घेतली. या भेटी दरम्यान वाघाचा तत्काळ बंदोबस्त करण्याची मागणी केली. यावेळी ना. मुनगंटीवार यांनी मुरमाडी व परिसरातील नागरिकांना लाकूड फाट्यासाठी जंगलात जाण्याची गरज पडू नये, यासाठी गावातच लाकूड व बांबू उपलब्ध करून द्यावे तसेच प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत सर्व लाभार्थ्यांना गॅस कनेक्शन द्यावे व जंगलाला कुंपन करण्याचे निर्देश मुख्य वनसंरक्षकांना दिले. वाघाला जेरबंद करण्यासाठी लवकरच उपाययोजना केल्या जातील, असेही ना. मुनगंटीवार यांनी शिष्टमंडळाला आश्वासन दिले.
मृत महिलेच्या कुटुंबाला ७५ हजारांची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 11:50 PM
तालुक्यातील महादवाडी येथील पाच महिला केवाडा जंगलात कुड्याची फुले आणायला गेल्या असता, अचानक वाघाने महिलांवर हल्ला चढविला. यामध्ये एक महिला जागीच ठार झाली, तर दोन महिला गंभीर जखमी झाल्या. ही घटना रविवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेनंतर खा. अशोक नेते व भाजप पदाधिकाऱ्यांनी गावाला भेट देऊन मृतकाच्या कुटूंबाला तत्काळ ७५ हजार रूपयाची आर्थिक मदत दिली.
ठळक मुद्देअशोक नेते यांची भेट : वाघाच्या हल्ल्यात महिला ठार