जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या ८२ हजार ९३ वर पोहोचली आहे. सध्या २ हजार ३३ बाधितांवर उपचार सुरू आहेत. ४ लाख ७३ हजार ६४४ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ३ लाख ८८ हजार ६३ नमुने निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १,४५४ बाधितांचे मृत्यू झाले. यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील १,३४७, तेलंगणा दोन, बुलडाणा एक, गडचिरोली ३८, यवतमाळ ५०, भंडारा ११, वर्धा एक, गोंदिया दोन आणि नागपूर येथील दोन बाधितांचा समावेश आहे. नागरिकांनी नियमित मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षित अंतर राखावे आणि कोरोनाची लस घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले.
चार तालुक्यात शून्य रूग्ण
आज सिंदेवाही, सावली, पोंभूर्णा व जिवती तालुक्यात एकही कोरोना पॉझिटिव्ह आढळला नाही. पॉझिटिव्ह आलेल्या ११९ रूग्णांमध्ये चंद्रपूर मनपा क्षेत्र २८, चंद्रपूर तालुका ११, बल्लारपूर ३१, भद्रावती ७, ब्रह्मपुरी ६, नागभीड ४, सिंदेवाही, पोंभूर्णा, सावली, जिवती तालुक्यात शून्य, मूल ७, गोंडपिपरी ३, राजुरा १२, चिमूर १, वरोरा १, कोरपना ६ व इतर ठिकाणच्या दोन रूग्णांचा समावेश आहे.
चंद्रपुरात एक मृत्यू नाही
आज मृत झालेल्यांमध्ये बल्लारपूर तालुक्यातील ५१ वर्षीय पुरूष, वरोरा तालुक्यातील ४२ वर्षीय पुरूष, भद्रावती तालुक्यातील घोट निंबाळा येथील ५५ वर्षीय महिला, कोरपना तालुक्यातील पिपरी येथील ५२ वर्षीय पुरूष, गोंडपिपरी तालुक्यातील सोमनपल्ली येथील ६५ वर्षीय महिला तर यवतमाळ जिल्ह्यातील इंदिरा चौक वणी येथील ६२ वर्षीय महिला, तर ६० वर्षीय महिलेचा समावेश आहे. चंद्रपुरात एकही मृत्यू झाला नाही.