लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील ५२ ग्रामपंचायतींसाठी आज सोमवारी मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. सकाळी ७ वाजतापासून मतदानाला सुरुवात झाली. सायंकाळी ५ वाजेपर्यंत सर्व तालुकेमिळून सरासरी ८० टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक उपजिल्हाधिकारी चिखले यांनी दिली.जिल्ह्यातील मूल, राजूरा, चंद्रपूर, भद्रावती, नागभीड, जीवती, वरोरा, पोंभुर्णा, चिमूर तालुक्यातील ५२ ग्रामपंचायतीत ही निवडणूक होत आहे. सोमवारी मतदानाच्या पार्श्वभूमीवर संबंधित गावांत पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. नागभीड तालुक्यातील चिखलगाव, गोविंदपूर, गिरगाव, मांगली आणि मिंथूर या पाच ग्रामपंचायतीमध्ये सरासरी ७९ टक्के, बल्लारपूर तालुक्यातील कोठारी, बामणी, कवडझई, इटोली आणि काटवली (बामणी) या पाच ग्रामपंचायतीसाठी सरासरी ६९ टक्के मतदान झाले.भद्रावती तालुक्यातील रानतळोधी विसलोन, गुंजाळा, टेकाडी, चिचोली, चारगाव, धानोली या सात ग्रामपंचायतींमध्ये सरासरी ६९.९२ टक्के मतदान झाले. पोंभूर्णा तालुक्यातील बोर्डा झुल्लूरवार व बोर्डा बोरकर या दोन ग्रामपंचायतीमध्ये सरासरी ८५ टक्के मतदान झाले. मूल तालुक्यातील उश्राळा चक, बेंबाळ, बोंडाळा खुर्द, आकापूर, गडीसुर्ला, बाबराळा आणि चकदुगाळा या सात ग्रामपंचायतींमिळून सरासरी ८२.५२ टक्के तर कोरपना तालुक्यातील बाखर्डी, कुकडसाथ, निमनी, कवठाला, गाडेगाव (विरुर), अंतरगाव, कोडशी, माथा, बोरगाव या नऊ ग्रामपंचायतींसाठी ८५ टक्के मतदान झाले.चिमूर तालुक्यातील सावरी (बिडकर), सोनेगाव (वन), रेंगाबोडी व आमडी (बेगडे) या चार ग्रामपंचायतीसाठी सरासरी ८७.६० टक्के मतदान झाले.राजुरा तालुक्यातील देवाळा, हरदोना खुर्द, विरुर स्टेशन, डोंगरगाव या ग्रामपंचायतीसाठी एकूण सरासरी ७५ टक्के मतदान झाले. चंद्रपूर तालुक्यातील पाच ग्रामपंचायतीसाठी सरासरी ७८ टक्के तर जिवती तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीसाठी ८१ टक्के मतदान झाले.बॉक्सजिल्ह्यातील सर्व ५२ ग्रामपंचायतींमध्ये अतिशय शांततेत मतदान झाले. यातील ४१८ सदस्य व ४९ सरपंच पदासाठी एकूण १५०१ उमेदवार रिंगणात आहेत. सर्वांचे भाग्य आज मशीनबंद झाले. मंगळवारी सकाळी १० वाजता संबंधित तालुकास्थळी मतमोजणीला सुरुवात होणार आहे.वरोरा तालुक्यातील दहेगाव ग्रामपंचायतीमध्ये ९३ टक्के मतदान झाले.कोठारी येथे रात्रीपर्यंत चालले मतदानबल्लारपूर तालुक्यातील कोठारी येथील प्रभाग क्रमांक पाच मध्ये १ हजार १०१ मतदार आहेत. या मतदान केंद्रावर मतदारांनी दुपारी ४ वाजता पासून मतदानासाठी येण्यास सुरूवात केली.दरम्यान वीज पुरवठाही खंडित झाला. यामुळे मतदानाची वेळ सकाळी ७वाजता ते सायंकाळी ५.३० वाजता असूनही रात्री ८ वाजेपर्यंत मतदान प्रक्रीया सुरू असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाºयांनी दिली.
५२ ग्रामपंचायतींमध्ये सरासरी ८० टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 10:40 PM
जिल्ह्यातील ५२ ग्रामपंचायतींसाठी आज सोमवारी मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. सकाळी ७ वाजतापासून मतदानाला सुरुवात झाली.
ठळक मुद्देआज मतमोजणी : कुठेही अनुचित प्रकार नाही