लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोना आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी ग्रामीण भागात विविध प्रतिबंध उपाययोजनांची जिल्हा निधीअंतर्गत ८६ लाखांचा निधी देण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे. या निधीतून सोडियम हायड्रोक्लोराईड व लॉयझॉल, प्राथमिक आरोग्य केंद्रांना मास्क, सॅनिटयझर व तत्सम साहित्य खरेदी करून वितरीत करण्यात येणार आहे, अशी माहिती जि. प. अध्यक्ष संध्या गुरनुले यांची मंगळवारी दिली.दिवसेंदिवस जगभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. भारताच्या तुलनेत इतर देशांची स्थिती महाभयंकर आणि विदारक आहे. त्यामुळे अशी परिस्थिती भारतावर येवू नये, यासाठी सरकारकडून विविध उपयोजना सुरू आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेनेही ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सुरक्षा व उपचार मिळावे, यासाठी मदतीचा निर्णय घेऊन अंमलबजावणी केली जात आहे. मागील महिन्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ च्या कलम ५४ (२) नुसार जिल्हा निधीअंतर्गत ३० लाखांचा निधी मंजूर केला होता. परंतु राज्यात कोरोना विषाणूच्या विळख्यात आलेल्या नागरिकांची वाढती संख्या लक्षात घेऊन खबरदारी म्हणून जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना प्रतिबंधासाठी उपाययोजना करण्यासाठी जिल्हा परिषदेने ग्रामपंचायतींतर्र्फे सर्व गावांमध्ये निजंर्तुकीकरण फवारणी सुरू करण्यात आली. सोडियम हायड्रोक्लोराईड व लॉयझॉलची आवश्यकता लक्षात घेऊन जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाला सदर साहित्य खरेदी करण्याकरिता २८ लाखांचा निधी देण्यात येईल.ग्रामीण भागातील जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी जिल्ह्याभरात कार्यरत असणाऱ्या सर्व ५८ प्राथमिक आरोग्य केंद्रांना त्यांच्या पातळीवर मास्क, सॅनिटयझर व तत्संबंधी इतर अत्यावश्यक साधनसामुग्री खरेदीकरिता प्रत्येकी एक लाख याप्रमाणे ५८ लाखांचा निधी पुन्हा मंजूर करण्यात आला. हा निधी जिल्हा परिषदेच्या पंचायत विभाग आणि सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना लवकरचं वितरीत करण्यात येणार आहे.गावांमध्ये निजंर्तुकीकरण फवारणीजिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना आजारावर उपचारासाठी जिल्हा परिषदेने जिल्हा निधी अंतर्गत निधी मंजूर करून यंत्रणा सक्रिय केली. आदिवासी व ग्रामीण भागातील सर्व ग्रामपंचायतींतर्फे गावामध्ये निजंर्तुकीकरण फवारणी केली जात आहे. सोडियम हायड्रोक्लोराईड व लॉयझॉल खरेदीच्या सूचना देण्यात आल्या. जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाने याकरिता निधी राखून ठेवला आहे. सर्व कर्मचाऱ्यांनी या मोहिमेत सहभागी झाले आहेत.दिवसेंदिवस जगभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. या आजारापासून जिल्ह्यातील नागरिक सुरक्षित राहावे, यासाठी आरोग्य विभाग कार्य करत आहे. विविध विभागांच्या सहकार्याने प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी जिल्ह्यात सुरू आहे.- संध्या गुरनुले, अध्यक्षजिल्हा परिषद चंद्रपूर
कोरोना प्रतिबंधासाठी जिल्हा निधीअंतर्गत ८६ लाखांचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2020 5:00 AM
दिवसेंदिवस जगभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. भारताच्या तुलनेत इतर देशांची स्थिती महाभयंकर आणि विदारक आहे. त्यामुळे अशी परिस्थिती भारतावर येवू नये, यासाठी सरकारकडून विविध उपयोजना सुरू आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेनेही ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सुरक्षा व उपचार मिळावे, यासाठी मदतीचा निर्णय घेऊन अंमलबजावणी केली जात आहे.
ठळक मुद्देजिल्हा परिषदेचा निर्णय : ५८ प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी पुरविणार आरोग्य साहित्य