साईनाथ कुचनकारलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : बहीण भावाच्या नात्याला एकत्रित बांधून ठेवण्यासाठी पोस्ट कार्यालय नेहमीच महत्त्वाचा धागा ठरले आहे. यावर्षी सुटीच्या दिवशीही अविरत सेवा देत पोस्टमनने भाऊ-बहीणींमध्ये आत्मिक प्रेमाचे नाते जपले आहे. यावर्षी तब्बल ९३ हजार राखी जिल्हा, देश तसेच देशसेवा करणाऱ्या सैनिक भावांना पोहचविण्याचे महत्त्वाचे काम पोस्ट विभागाने केले आहे.प्रत्येक वर्षी बहिणीला भावाकडे आणि भावाला बहिणीकडे जाणे शक्य होत नाही. कोरोना संकट तसेच येणे अशक्य असल्यामुळे असंख्य बहिणींनी यावर्षीही डाकेने राख्या पाठविणे पसंत केले आहे. पोस्ट विभागाने तब्बल ६० हजार राख्या चंद्रपूर येथून देशातील विविध भागात पाठविल्या आहे. तर शनिवार तसेच रविवारी १८ हजार राख्यांचे चंद्रपूर जिल्ह्यात वितरण केले आहे. विशेष म्हणजे, देशाच्या सीमेवर काम करणाऱ्या भावांनाही त्यांच्या बहिणीची राखी पोहचविण्याचे महत्त्वाचे काम पोस्टमनने केले आहे. यावर्षी तब्बल १५ हजार राख्या चंद्रपूर जिल्ह्यातून बाॅर्डरवर पोहचविण्यात आल्या आहेत.कोरोनामुळे निर्बंध आहे. त्यामुळे मागील दोन वर्षांपासून पोस्टाने राख्या पाठविण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. पोस्ट विभागानेही तत्परतेने भावांपर्यंत राख्या पोहचवित भाऊ-बहीणींच्या प्रेमात आणखीच आत्मियता निर्माण केली आहे. यासाठी सिनिअर पोस्टमास्टर कोमकोमवार, असिस्टंट पोस्टमास्टर (मेल) प्रशांत कन्नमवार, मेल शार्टर राजू मत्ते यांच्यासह जिल्ह्यातील विविभ गावातील पोस्टमनने आपले काम चोखपणे बजावले आहे. रविवारी सुटी तसेच रक्षाबंधन असतानाही गावागावातील पोस्टमन राख्या पोहचवून देण्याच्या कामात मग्न असल्याचे चित्र जिल्ह्यात बघायला मिळाले.चंद्रपूरात १८ हजार राख्यांचे वितरणचंद्रपूर जिल्ह्यात रविवारी दुपारी १२ वाजेपर्यंत १८ हजार राख्यांचे वितरण करण्यात आले. विशेष म्हणजे, शनिवारपर्यंत १० हजार तसेच रविवारी दुपारपर्यंत ८ हजार राख्या पोहचविण्यात पोस्टमनने दिवसरात्र एक करीत बहीण- भावाच्या नात्यात एक महत्त्वपूर्ण भूमिका जावली आहे.
बाहेरगावी पाठविल्या ६० हजार राख्याभारतीय डाक विभागाने ६० हजार राख्या बाहेर जिल्ह्यासह इतर राज्यात पाठविल्या आहेत. बहिण भावाचे हे नाते जोपासण्यासाठी डाक विभागाकडून आधार दिला जात आहे. कोरोना संकटामुळे यावर्षीही अनेक बहिणी भावाच्या भेटीला जाऊ शकल्या नाही. त्यांच्यासाठी पोस्टमनने भावाची भूमिका बजावत आपले कर्तव्य पार पाडले.
रक्षाबंधणाचा सण महत्त्वाचा असतो. त्यामुळे पोस्ट कार्यालयाने यावर्षीही सुटीच्या दिवसी राख्या घरपोच वितरणाचे काम केले आहे. जिल्ह्यात ३५० पोस्टमनने हे कर्तव्य बजावले आहे. मागील वर्षाप्रमाणे यावर्षीही कोरोना संकटामुळे अनेकांनी गावी जाणे टाळले. त्यामुळे पोस्ट कार्यालयात मोठ्या प्रमाणात राख्या वितरणाचे काम होते. ते सक्षमपणे सर्वांनी बजावले.- प्रशांत कन्नमवार असिस्टंट पोस्टमास्टर मेल, चंद्रपूर