लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघांत एकूण ९४ उमेदवार रिंगणात असून, डिपॉझिट (अनामत रक्कम) वाचविण्यासाठी प्रत्यक्ष झालेल्या एकूण वैध मतदानाच्या एकषष्ठांश मते मिळविणे आवश्यक आहे. निवडणूक प्रचारादरम्यान अनेक उमेदवारांकडून प्रतिस्पर्धी उमेदवाराचे डिपॉझिट जप्त करू, अशी गर्जना केली जाते. डिपॉझिट जप्त म्हणजे, नामुष्कीजनक पराभव मानला जातो. एकूण वैध मतांच्या एकषष्ठांशही (१६.६६ टक्के) मते जे मिळवू शकत नाहीत, त्यांचे डिपॉझिट जप्त होते.
राज्यातील बदललेल्या राजकीय समीकरणानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. जिल्ह्यात वरोरा, चंद्रपूर, राजुरा, बल्लारपूर, चिमूर, ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात निवडणूक होणार आहे. या सर्व मतदारसंघांत प्रचार शिगेला पोहोचला आहे. भाजप, काँग्रेससह अन्य पक्षांचे तसेच अपक्ष उमेदवारही निवडणूक रिंगणात आहे. काही विधानसभा क्षेत्रात दिग्गज उमेदवार तर काही ठिकाणी नवखे चेहरे निवडणूक रिंगणात आहे.
अनेकांना मोह आवरेना....
- लोकशाहीत कोणीही निवडणूक लढवू शकतो. पक्षाकडून उमेदवारी मिळाली नाही तर अनेकजण अपक्ष म्हणून निवडणूक लढवितात. आपल्यामुळे पुढील उमेदवार अडचणीत सापडेल, अशी गर्जनाही अनेकवेळा उमेदवार करतात.
- यापूर्वी विधानसभा निवडणुकीत अनेकांची अनामत रक्कम जप्त झालेली आहे. काही जणांना निवडणूक लढविण्याचा मोह आवरत नाही. आपण निवडून येऊ या आशेवर ते निवडणूक लढवतात.
कोणाला किती 'डिपॉझिट'?सर्वसाधारण गटातील उमेदवारांना डिपॉझिट म्हणून दहा हजार रुपये तर अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांना पाच हजार रुपये भरावे लागतात. एकूण वैध मतांच्या एकषष्ठां- शापेक्षा कमी मते मिळाल्यास अनामत रक्कम परत मिळत नाही, एकूण वैध मतांच्या एक षष्ठांशापेक्षा जास्त मते मिळाली तर अनामत रक्कम परत केली जाते.
कोणत्या मतदारसंघात किती उमेदवार?चंद्रपूर - १६राजुरा - १४ बल्लारपूर - २० चिमूर - १३ ब्रह्मपुरी - १३वरोरा - १८