स्त्री ही पुरूषांपेक्षा कोठेही कमी नसते. पुरुषांप्रमाणे देखील सारी कामे करू शकते.
काही कामात तर मुलांपेक्षा मुली आणि पुरूषांपेक्षा महिला आघाडीवर आहेत. दहावी व बारावीचे निकाल दरवर्षी जाहीर होतात ही गोष्ट ठळकपणे दिसून येत. शासकीय सवलती व साधने उपलब्ध झाल्यास मुली मुलांपेक्षा काकणभर सरस ठरतात. मुलींमध्ये कोणत्याही प्रश्?नाचे गांभीर्य लवकर कळते. देशाच्या विकासात या पुढच्या काळात युवती- महिलांचा वाटा मोठा असणार आहे.
बॉक्स
मुलींना मुलांइतकेच शिक्षण मिळावे
सरकारने केवळ बेटी बचाव मोहीम न चालवता बेटी पढाव याकडेही लक्ष दिले पाहिजे.
स्त्री भ्रूण हत्या टाळली पाहिजे. मुलींना मुलाइतकेच शिक्षण दिले पाहिजे. अनेक कामे आता महिला करू लागल्या आहेत. देशाच्या विकासात या पुढच्या काळात मुलींचा म्हणजेच महिलांचा वाटा मोठा असणार आहे.
प्रत्येक टप्प्यावर लसीकरण
बालकांना प्रसूतीगृहामध्ये बीसीजी, ओपीव्हीओ व हिपॅटायटिसबी लस दिली जाते. लसीकरणाच्या प्रत्येक टप्प्याची काळजी घेतली जात असल्याने बालमृत्यू दर कमी झाला. डीपीटी, पोलिओ, रोटाव्हायरस लस, न्यूमोकोकल कॉन्जुगेट लस अशा प्रमुख लसी महत्त्वाच्या आहेत.बालकांना प्रसूतीगृहामध्ये बीसीजी, ओपीव्हीओ व हिपॅटायटिसबी लस दिली जाते. लसीकरणाच्या प्रत्येक टप्प्याची काळजी घेतली जात असल्याने बालमृत्यू दर कमी झाला.