शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

धाबा येथे सांस्कृतिक सभागृहासाठी ९८ लाख मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2018 12:18 AM

राज्याचे अर्थमंत्री तथा चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने गोंडपिपरी तालुक्यातील श्री संत परमहंस कोंडय्या महाराज संस्थान, धाबा येथे सांस्कृतिक सभागृहाच्या बांधकामासाठी ९७ लाख ८३ हजार रूपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे.

ठळक मुद्देअर्थमंत्र्यांनी दिलेला शब्द केला पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्याचे अर्थमंत्री तथा चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने गोंडपिपरी तालुक्यातील श्री संत परमहंस कोंडय्या महाराज संस्थान, धाबा येथे सांस्कृतिक सभागृहाच्या बांधकामासाठी ९७ लाख ८३ हजार रूपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे.शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने ३१ आॅक्टोबर रोजी याबाबतचा शासन निर्णय निर्गमित केला आहे. राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार अ‍ॅड. संजय धोटे आणि जिल्हा परिषद सदस्य वैष्णवी बोडलावार यांच्या मागणीच्या अनुषंगाने अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेला शब्द पूर्ण केला आहे.गोंडपिपरी तालुक्यातील श्री क्षेत्र धाबा येथील संत परमहंस कोंडय्या महाराज संस्थान येथे सांस्कृतिक सभागृहाचे बांधकाम करण्याची मागणी राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार अ‍ॅड. संजय धोटे आणि जिल्हा परिषद सदस्य वैष्णवी बोडलावार यांनी एका कार्यक्रमात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली होती. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांना तेव्हा ही मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. दिलेल्या आश्वासनाची त्यांनी पूर्तता केली असून पर्यटन स्थळांच्या ठिकाणी पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत सदर निधी मंजूर करण्यात आला आहे. धाबा येथील संत परमहंस कोंडय्या महाराज संस्थान अतिशय प्रसिध्द तिर्थस्थळ व पर्यटन स्थळ असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भाविक दर्शनासाठी येत असतात. प्रत्येक माघ शुध्द तृतीयेला या ठिकाणी मोठी यात्रा भरते. याठिकाणी सांस्कृतिक सभागृह आवश्यक होते. आता या मागणीची पूर्तता झाली आहे.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार