लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : नागपूरवरून चंद्रपूरकडे जाणाऱ्या बागडी ट्रॅव्हल्समध्ये दारू असल्याची गुप्त माहिती उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना मिळाली. वरोरा येथे ट्रॅव्हल्सची तपासणी केली असता ट्रॅव्हल्समध्ये ९९ हजार रुपयांची विदेशी दारू आढळून आली. याप्रकरण्ी तिघांना अटक करून ट्रॅव्हल्स व दारू जप्त करण्यात आली.नागपूरकडून चंद्रपूरकडे जाणारी एम.एच. ४० एटी ९९९९ या क्रमांकाची बागडी ट्रॅव्हल्सची वरोरा येथील रत्नमाला चौकात पोलिसांनी तपासणी केली असता टुलबॉक्समध्ये ९९ हजार रुपयांची विदेशी दारू आढळून आली. वरोरा पोलीस स्टेशनमध्ये ट्रॅव्हल्स लावण्यात आल्यानंतर प्रवाशांना परत पाठविण्यात आले. याप्रकरणी दीपक शामराव कामतवार (३८), शेख ताज गौस शेख (३३), शशीकांत घनश्याम उराडे (२८) रा. सर्व चंद्रपूर यांना ताब्यात घेवून दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करून अटक केली. सदर कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिकारी प्रताप पवार यांच्या मार्गदर्शनात विशेष पथकाने केली.निफंद्रा येथे सव्वा लाखांचा दारूसाठा जप्तगेवरा : वडसावरून विनानंबर प्लेटच्या मोटार सायकीलवर दररोज देशी दारूच्या वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती पाथरी पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी मुडझा-व्याहाड मार्गावर नाकाबंदी केली. मात्र पोलिसांना बघून भरधाव वाहन पडविले. पोलिसांनी पाठलाग करून निफ्रंदा गावाजवळ मोटार सायकलला गाठले. यावेळी दुचाकीवरील पोत्यातून ४० हजार रुपये किंमतीच्या ४०० बॉटल दारु व दुचाकी असा एकणू एक लाख ३० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यावेळी कमल अहुजा (२७) याला अटक करण्यात आली. तर एकजण फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. ही कारवाई ठाणेदार शेख यांच्या मार्गदर्शन उपनिरीक्षक पंचबुध्दे, अजय वडलावार, किशोर वाकाटे, रूपेश साव, पंकज मडावी, लेनगुरे आदींनी केली.
९९ हजाराची विदेशी दारू जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 1:19 AM
नागपूरवरून चंद्रपूरकडे जाणाऱ्या बागडी ट्रॅव्हल्समध्ये दारू असल्याची गुप्त माहिती उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना मिळाली. वरोरा येथे ट्रॅव्हल्सची तपासणी केली असता ट्रॅव्हल्समध्ये ९९ हजार रुपयांची विदेशी दारू आढळून आली.
ठळक मुद्देवरोरा पोलिसांची कारवाई : तिघांना अटक, ट्रॅव्हल्स जप्त