लोकमत न्यूज नेटवर्क नागभीड : भरधाव ट्रेलरने बसला धडक दिल्याने १७ प्रवासी जखमी झाले. ही घटना मंगळवारी (दि. २६) दुपारी १ वाजता बामणी येथे घडली. यातील तीन प्रवासी गंभीर जखमी आहेत. त्यांना उपचारासाठी चंद्रपूरला हलविण्यात आले. अन्य १४ जखमींवर नागभीड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
भंडारा जिल्ह्यातील पवणी आगाराची पवणी-नागभीड ही बस (एम. एच. ४० एन ८६२७) कन्हाळगाव मार्गे नागभीडला दररोज सोडली जाते. ही बामणीकडे येत असताना त्यामध्ये २२ प्रवासी होते. यावेळी एम.एच.४०-६४५९ क्रमांकाचा ट्रेलर नागभीडकडून पवणीकडे जात होता. दरम्यान, चालकाच्या चुकीने भरधाव ट्रेलरने बसला जोरदार धडक दिली. या धडकेत ट्रेलर उलटला तर बसमधील १७ प्रवासी जखमी झाले. जखमींमध्ये वैष्णव गायकवाड (वय १६, चांदी), प्रणाली हुमणे (२०, धामणी), कमला दडमल (६३, कन्हाळगाव), बाबुराव दडमल (७२, कन्हाळगाव), महेश पातोडे (४५, डोंगरगाव), रेखा हेमणे (४५, नागभीड), समीक्षा सावसाकडे (१७, भिवापूर), सिंधू शेंडे (६०, नागभीड), धर्मराज बागडे (५०, कन्हाळगाव), प्रमोद मते (५३, अड्याळ), शालू हुमणे (४५, धामणी), रूद्र मगरे (१४ चांदी), जयराम पुंडे (७०, वरोरा), कुलदीप पाथोडे (१८, डोंगरगाव), संघरत्न बागडे (२१, कन्हाळगाव), पितांबर नागपुरे (५५, कन्हाळगाव), सुनीता गडमडे (४८, चांदी), वनंता बारेकर (३२, नवखळा) आणि भारती सावसाकडे (४०, भिवापूर) यांचा समावेश आहे. यातील गंभीर तिघांची नावे पोलिसांनी स्पष्ट केली नाहीत. अपघाताची माहिती मिळताच नागभीड पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले तर गंभीर तिघांना चंद्रपुरात हलविले.