शहरं
Join us  
Trending Stories
1
Prakash Ambedkar: वंचित कोणाला पाठिंबा देणार?; निकालाच्या आदल्या दिवशीच प्रकाश आंबेडकरांनी जाहीर करून टाकलं!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : योगायोग! उद्या निकाल लागणार, त्याच वेळी पहाटेच्या शपथविधीला पाच वर्ष पूर्ण होणार
3
Maharashtra Vidhan Sabha Results 2024: मुंबईतील 36 मतदारसंघांची  ‘येथे’ होणार मतमोजणी
4
'या' मतदारसंघांमध्ये अपक्ष उमेदवारांचं पारडं जड, सत्तास्थापनेत किंगमेकरही ठरणार?
5
तुमचं Aadhaar कार्ड हरवलंय, आणि नंबरही लक्षात नाहीये; आता काय करावं लागेल? जाणून घ्या 
6
Maharashtra Vidhan Sabha 2024: मुंबईतील २४ मतदारसंघांत महिलांचा 'मत'टक्का पुरुषांपेक्षा जास्त! 
7
छगन भुजबळ आणि माणिकराव शिंदे यांच्यात 'कांटे की टक्कर'; विक्रमी मतांचा फायदा कुणाला होणार?
8
दिंडोरीत पुन्हा घड्याळाची टिकटिक, की वाजणार तुतारी?
9
IND vs AUS : KL राहुलच्या विकेटसह पडली वादाची ठिणगी; खरंच चिटिंग झाली? (VIDEO)
10
Kalbhairav Jayanti 2024: शनिवारी चुकवू नका काल भैरवाची 'ही' उपासना; मिळेल सुख, दूर होईल निराशा!
11
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘एक्झिट पोल’ इतके गोंधळलेले का आहेत? 'हे' यावेत किंवा 'ते' यावेत; पण...
12
Video - नवरा-नवरीला गिफ्ट द्यायला आला अन् खाली कोसळला; स्टेजवरच हार्ट अटॅकने मृत्यू
13
ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज देणाऱ्या हिना खानचं टीव्हीवर कमबॅक, Bigg Boss 18 मध्ये दिसणार
14
केवायसी नाही म्हणून खाते फ्रीझ करू नका! आरबीआयने सर्व बँकांना खडसावले
15
मुंबईत मतमोजणीची तयारी पूर्ण; २,७०० हून अधिक कर्मचारी, १० हजार पोलीस तैनात
16
करमाळ्यात कुर्डूवाडीसह ३६ गावे ठरणार गेमचेंजर; 'हा' फॅक्टर निर्णायक राहणार!
17
Adani Group Stocks: आरोपांनंतर अदानी समूहाचे शेअर्स आजही गडगडले; 'या' कंपनीला सर्वाधिक फटका
18
अभिनयक्षेत्रातून निवृत्ती घेणार का? अनिल कपूरला नाना पाटेकर म्हणाले- "माझ्याकडे काम नसेल तर..."
19
कोहलीचा 'विराट' संघर्ष कायम! हेजलवूडच्या अतिरिक्त उसळी घेणाऱ्या चेंडूवर 'किंग'ची झाली 'शेळी'
20
तेराव्या वर्षी सेल्समन म्हणून काम, आईकडून १० हजार घेऊन सुरू केला व्यवसाय, उभारला ३३ हजार कोटींचा ब्रँड

महारॅलीतून जोरदार शक्तीप्रदर्शन; मुनगंटीवार व वडेट्टीवारांचे नामांकन दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2024 2:46 PM

एकाच दिवशी तब्बल ५७ जणांचे नामांकन : भाजपमध्ये वरोरा, राजुरा व ब्रह्मपुरीत बंडाचे निशाण

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : विधानसभा निवडणुकीसाठी सहाही मतदार संघात सोमवारी तब्बल ५७ जणांनी आपले नामांकन दाखल केले. बल्लारपूर मतदार संघात महायुतीच्या माध्यमातून भाजपकडून विकासपुरुष राज्याचे सांस्कृतिक कार्य, वन व मत्स्य व्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि ब्रह्मपुरी विधानसभा मतदार विदर्भाचा बुलंद आवाज ओबीसी नेते राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून काँग्रेसकडून हजारो नागरिक, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या स्वयंस्फूर्त प्रतिसादातून निघालेल्या महारॅलीच्या साक्षीने आपले नामांकन दाखल करून निवडणुकीचा बिगुल फूंकला. बल्लारपूर आणि ब्रहापुरीत निघालेल्या या दोन्ही नेत्यांच्या महारैलीने सर्वाचे लक्ष वेधले होते.

बल्लारपुरात सुधीरभाऊ आगे बढौच्या तर ब्रहापुरीत विजय वडेट्टीवार यांच्या विजयाचा जयघोष महारैलीतील नागरिकांकडून होत होता, चंद्रपूर जिल्ह्यातील राजकारण मुनगंटीवार आणि वडेट्टीवार या दोन दिग्गज नेत्यांच्या सभोवताली फिरते. या नेत्यांनी आपल्या कारकिर्दीत चंद्रपूर जिल्ह्याला विकासाची नवी दृष्टी दिली. मुनगंटीवारांनी आपल्या दूरदृष्टीतून विकासाची नवी संकल्पना जिल्ह्यात प्रत्यक्ष साकारली आहे. न भूतो असा विकास बल्लारपूर मतदार संघातच नव्हे तर जिल्ह्यात व राज्यात करून दाखविला. म्हणूनच त्यांना विकास पुरुष ही उपाधी दिली जाते. यावेळी आम्ही जातीपातीच्या नावावर नाही तर विकासाच्या मुद्द्यावर मते देऊ, अशा भावना सहभागींनी त्यांच्या रॅलीत बोलून दाखविल्या. 

ब्रह्मपुरी विधानसभा मतदार संघ विकासापासून अलिप्त होते. २०१४ मध्ये या क्षेत्राच्या नेतृत्वाची धुरा येथील जनतेने विजय वडेट्टीवार यांच्या खांद्यावर दिली. त्यांनी अवघ्या दहा वर्षाच्या काळात राज्यात सत्ता नसताना मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणला या निवडणुकीतही आमचा निर्धार वडेट्टीवार हेच असल्याचे मत रैलीतील नागरिकांनी व्यक्त केले. 

बल्लारपूर मतदारसंघ महाराष्ट्रात अग्रेसर : मुनगंटीवार विकासाच्या बाचतीत मूल, पोंभुर्णा, बल्लारपूर हा विधानसभा मतदारसंघ महाराष्ट्रात अग्रेसर आहे. तो कायम अग्रेसर राहावा, यासाठी जनता पाठीशी आहे. जनतेच्या सूचनांमधूनच निवडणुकीचा जाहीरनामा तयार करण्यात आलेला आहे. हा जाहीरनामा राज्याच्या प्रगतीचा गेम चेंजर ठरणार आहे, असा विश्वास राज्याचे वने, सास्कृतिक कार्य व मास्य व्यवसाय मंत्री, तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. ना. सुधीर मुनगंटीवार यानी बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे भाजप व महायुतीचे अधिकृत उमेदवार, म्हणून सोमवारी (ता. २८) अर्ज भरला. अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचा आमदार म्हणून या क्षेत्राचा सामाजिक, आर्थिक आणि पायाभूत सुविधांचा विकास करण्याकडे विशेष भर दिला, विविध समाजाच्या हक्काचे समाजभान गावागावांमध्ये निर्माण केले, आरोग्य धावस्था अधिक सक्षम आणि बळकट करण्यासाठी ग्रामीण आरोग्य केंद्रांचे आधुनिकीकरण केले. केवळ बल्लारपूरमध्येच नव्हे, तर संपूर्ण राज्यातील जनता भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या पाठीशी राहील, असा विश्वासही ना. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. पुलांचे जाळे निर्माण करून पायाभूत सुविधांना उभारी देण्याचे काम केले.

सदैव लोकांच्या सुख दुःखाचा साथी : विजय वडेट्टीवारमी सामान्यांतून आलेला असल्याने सामान्यांची वेदना जाणतो. ब्रह्मपुरी क्षेत्रातील प्रत्येक जनतेच्या सुख दुःखाची साथी आहे. विजयकिरण फाउंडे शनच्या माध्यमातून अनेक लोकोपयोगी कार्य केले. आपण सतत मला प्रेम दिले. यापुढेही जनसेवेची पुन्हा एकदा संधी द्या. असे आवाहन विधानसभेचे विरोधी पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी यावेळी केले.

आज नामांकनाचा शेवटचा दिवसः बुधवारी छाननी २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख २९ ऑक्टोबर असून, ३० ऑक्टोबरला अर्जाची छाननी होणार आहे. अर्ज माघारी घेण्याची मुदत ४ नोव्हेंबर २०२४ पर्यंत आहे.

मतदार संघनिहाय ५७ उमेदवारांचे नामांकनराजुरा विधानसभा: सुभाष धोटे (काँग्रेस), देवराव भोंगळे (भाजप), अॅड. यामनराव चटप (स्वतंत्र भारत पक्ष), अॅड. संजय धोटे (अपक्ष), सुदर्शन निमकर (अपक्ष), प्रिया खाडे (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया), निनाद बोरकर (अपक्ष), चित्रलेखा धंदरे (अपक्ष), सचिन भोयर (मनसे), गजानन जुमनाके (गोंडवाना गणतंत्र पार्टी), प्रठीण कुमरे (बहुजन मुक्ती पार्टी) 

चंद्रपूर विधानसभा: किशोर जोरगेवार (भाजप), प्रवीण पडवेकर (काँग्रेस), सुरेश पाईकराव (अपक्ष), राजेश घुटके (अपक्ष), प्रियदर्शन इंगळे (अपक्ष), मिलिंद दहिचले (अपक्ष), ज्ञानेश्वर नगराळे (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया-अ), भानेश मातंगी (अपक्ष) व भुवनेश्वर निमगडे (अपक्ष).

बल्लारपूर विधानसभा: सुधीर मुनगंटीवार (भाजप), किशोर उईके (अपक्ष), संजय गावंडे (अपक्ष), रामराव चव्हाण (अपक्ष), निशा धोंगडे (अपक्ष), राजू जांभुळे (अपक्ष), सतीश मालेकर (वंचित बहुजन आघाडी), कुणाल गायकवाड (अपक्ष), अरुण देवीदास कांबळे (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रिफॉमिस्ट), डॉ. अभिलाषा गावतुरे (अपक्ष)

ब्रह्मपुरी विधानसभा: कृष्णा सहारे (भाजप), विनोद नवघडे (अपक्ष), पसंत पारजूकर (अपक्ष), अनंता भोयर (पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक)

चिमूर विधानसभा: सतीश वारजूकर (काँग्रेस), अरविंद चांदेकर (वंचित बहुजन आघाडी), अनिल घोंगळे (अपक्ष), हेमंत दांडेकर (अपक्ष), धनंजय मुंगले (अपक्ष), कैलास बोरकर (अपक्ष), प्रकाश नान्हे (अपक्ष), डॉ. हेमंत उरपुष्डे (अपक्ष).

वरोरा विधानसभा: प्रठीण काकडे (काँग्रेस), करण देवतळे (भाजप), रमेश राजूरकर (अपक्ष), विनोद खोब्रागडे (अपक्ष), अमोल बावणे (अपक्ष), राजू गायकवाड (अपक्ष), जयवंत काकडे (अपक्ष), जयेत ठेमुर्डे (अपक्ष), अहेतेशाम अली (प्रहार जनशक्त्ती), श्रीकृष्ण दडमल (अपक्ष), रंजना पारशिये (अपक्ष), मुकेश जीवतोडे (अपक्ष). डॉ. चेतन खुटेमाटे (अपक्ष), महेश ठेंगणे (अपक्ष), मुनेश्वर बदखल (अपक्ष) यांनी नामांकन दाखल केले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारchandrapur-acचंद्रपूर