लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : मिशन शक्ती अभियानाच्या शुभारंभासाठी अभिनेता व चित्रपट दिग्दर्शक आमिर खान रविवारी बल्लारपूर येथे आले होते. अत्यंत व्यस्त कार्यक्रमात त्यांनी विसापूर परिसरातील सैनिक शाळेत भेट दिली. सैनिकी शाळेच्या वतीने केलेल्या आदरातिथ्याने आमिर खान भारावले. विद्यालयातील भावी सैनिकांची माहिती जाणून घेतली. या घटनेने सैनिकी विद्यालयात चैतन्य निर्माण झाले आहे.देशभक्तीचा तेजस्वी वारसा पुढे नेणाऱ्या विसापूर परिसरातील १२४ हेक्टर जागेच्या विस्तीर्ण पसिरारात सैनिक शाळा अद्यावत स्वरूपात आकाराला आली आहे. सैनिक शाळेमुळे जिल्ह्याचा देशपातळीवर नावलौकीक वाढला. राज्याचे अर्थ नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रेमाच्या व आग्रहाच्या विनंतीवरून सामाजिक बांधिलकीचा ठसा उमटविणारे अभिनेता आमिर खान हे बल्लारपुरात दाखल झाले. दरम्यान, त्यांनी सैनिकी शाळेला भेट देवून पहिल्या तुकडीतील विद्यार्थ्यांशी आपुलकीने संवाद साधला. यावेळी प्राचार्य स्क्रॉड्रन लिडर नरेशकुमार यांनी आमिर खान यांना माहितीपटातून सैनिकी शाळेच्या वैशिष्ट्ये सांगितली. काही वर्षांतच ही सैनिकी शाळा देशाच्या गौरव वाढविणार, असा आशावाद आमीर खान यांनी व्यक्त केला. त्यांच्यासोबत विद्यार्थ्यांनी अविस्मरणीय क्षणांची आठवण म्हणून छायाचित्र काढून घेतले. यावेळी ना. सुधीर मुनगंटीवार, आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके, वन विकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, आमदार नाना शामकुळे, आमदार कीर्तीकुमार भांगडिया जि. प. अध्यक्ष देवराव भोंगळे, बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरीश शर्मा, उपप्राचार्य लेफ्टनंट कमांडर अनमोल उपस्थित होते.
आमिर खानच्या भेटीमुळे सैनिक ी शाळेच्या विद्यार्थ्यांत नवचैतन्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2019 12:50 AM
मिशन शक्ती अभियानाच्या शुभारंभासाठी अभिनेता व चित्रपट दिग्दर्शक आमिर खान रविवारी बल्लारपूर येथे आले होते. अत्यंत व्यस्त कार्यक्रमात त्यांनी विसापूर परिसरातील सैनिक शाळेत भेट दिली. सैनिकी शाळेच्या वतीने केलेल्या आदरातिथ्याने आमिर खान भारावले.
ठळक मुद्देआदरातिथ्याने भारावले : प्राचार्यांकडून जाणून घेतली माहिती