शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारा म्हणजे संविधान; राहुल गांधींचा भाजपावर घणाघात
2
सेबी प्रमुख माधबी बूच यांच्या अडचणी वाढल्या, संसदेच्या वरिष्ठ समितीने बजावले समन्स
3
१० रुपयांचं चॉकलेट, देवाचं दर्शन अन्...; अमेठी हत्याकांडात खळबळजनक खुलासा
4
इस्रायल-इराण संघर्षाचा परिणाम भारतावर होणार, सर्वसामान्यांच्या अडचणी वाढणार!
5
भारतीय क्रिकेटरच्या वडीलांची २६ लाखांची फसवणूक; पैसे परत मागताच जीवे मारण्याची धमकी
6
SBI On MTNL: संकटात आली 'ही' सरकारी कंपनी; आता SBI नं केली मोठी कारवाई, शेअर आपटला
7
"पाहिजे तेवढ्या फिती कापा, दीड महिन्याने..."; PM मोदींच्या दौऱ्यावरुन उद्धव ठाकरेंचा घणाघात
8
हार्दिक पांड्याशी घटस्फोटानंतर नताशाचं जबरदस्त कमबॅक, शूटिंग सेटवरील व्हिडिओ समोर
9
शरद पवारांची साथ सोडून काँग्रेसमध्ये गेलेल्या महिला नेत्याशी व्यासपीठावर छेडछाड
10
Bihar Politics : नितीश कुमार यांना भारतरत्न देण्याची मागणी; JDU कडून पोस्टरबाजी; भाजपचाही पाठिंबा
11
अरे देवा! मालगाडीचे २ डबे घसरले; बादल्या, कॅन घेऊन डिझेल लुटण्यासाठी लोकांची झुंबड
12
मैत्रीचा इतिहास: पाकिस्तान कदापी अण्वस्त्रधारी बनू शकला नसता; भारतावर आरोप झाला, इस्रायलने थेट अंगावर घेतला
13
राहुल गांधी कोल्हापूरात पोहचताच उचगावातील कौलारू घरात गेले, तिथे कोणाला भेटले? 
14
Weightless Tips: अमित शाहांनीसुद्धा 'या' पद्धतीने केले २५ किलो वजन कमी; सांगताहेत बाबा रामदेव!
15
IPO च्या तयारीत असलेल्या NSE ला सेबीकडून दिलासा; SEBIच्या इतिहासातील मोठ्या सेटलमेंटसाठी मंजुरी
16
NIA: महाराष्ट्रासह पाच राज्यांमध्ये एनआयएच्या धाडी; जालना, छत्रपती संभाजीनगरमधून तिघांना घेतलं ताब्यात
17
बायकोसाठी गाव सोडणार नाही तर बदलणार! आदिनाथ कोठारेच्या 'पाणी'चा हृदयस्पर्शी ट्रेलर रिलीज
18
करुन दाखवलं! दहावी, बारावी नापास पण वयाच्या २२ व्या वर्षी मिळवलं यश, झाली IAS
19
Navratri Puja Vidhi 2024: इच्छित मनोकामनापूर्ती करणारे 'काम्य व्रत' ललिता पंचमीला कसे करायचे? वाचा!
20
'आनंद आहेच पण आता...'; मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यावर 'हास्यजत्रा'चे दिग्दर्शक सचिन गोस्वामींची मार्मिक पोस्ट

साडेतीन वर्षांत ५४८ मुलींचे अपहरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 4:20 AM

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : जिल्ह्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत वाढ होतानाच, अल्पवयीन मुलींच्या अपहरणातही मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

चंद्रपूर : जिल्ह्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत वाढ होतानाच, अल्पवयीन मुलींच्या अपहरणातही मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. मागील साडेतीन वर्षांत ५४८ अल्पवयीन मुलींचे तर ९९ अल्पवयीन मुलांचे अपहरण झाले आहे. विशेष म्हणजे, लॉकडाऊन काळात सर्व कुटुंब एकत्र असतानाही व बाहेर पडण्यास बंदी असतानाही २१४ मुलींचे अपहरण झाल्याचे धक्कादायक वास्तव आहे. अनेकांचा शोध लावण्यास पोलीस विभागाला यश आले असले, तरी ही आकडेवारी चिंताजनक आहे.

२१व्या शतकात नवनव्या संसाधनांचा शोध लागला. त्यामुळे लहान वयातच मुलांच्या हातात अँड्राइड मोबाइल आले. यातील विविध अप्लिकेशनद्वारे देश-विदेशातील मित्र-मैत्रिणीच्या संगतीत अडकले. घरातील संवाद लोप पावला. त्यातच लॉकडाऊनमुळे शाळा महाविद्यालये बंद असल्याने, मुलांना ऑनलाइन शिक्षणांच्या नावाखाली मोबाइल वापरण्याची मोकळीक मिळाली. याकडे पालकांचे दुर्लक्ष झाले याचाच फायदा घेत, अनेकांनी आमिष दाखवून १८ वर्षांखालील सुमारे २१४ मुलींचे व ३१ मुलांचे अपहरण जानेवारी, २०२० पासून मे, २०२१ या कालावधीत करण्यात आल्याची नोंद जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात दाखल आहे, तर मागील साडेतीन वर्षांची आकडेवारी बघितल्यास जिल्ह्यात ५४८ मुलींचे तर ९९ मुलांचे अपहरण झाले. त्यापैकी ४२२ मुली व ८७ मुले शोधण्यात पोलिसांना यश आले आहे, तर उर्वरित ९६ मुली व १३ मुलांचा शोध सुरू आहे.

------

स्थानिक गुन्हे शाखेने परराज्यातून लावला मुलींचा शोध

जिल्ह्यातून बेपत्ता झालेल्या मुलींचा तपास स्थानिक पातळीवरील पोलीस करतात. चार महिन्यांत त्याचा शोध लागला नाही, तर तो स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात येते. स्थानिक गुन्हे शाखेचे एक विशेष पथक यासाठी काम करीत असते. आतापर्यंत स्थानिक गुन्हे शाखेने अपहरण झालेल्या मुली या हैदराबाद, राजस्थान, गुजरात आदी परराज्यातून हुडकून काढल्या आहेत. यावरून अपहरणाचे कनेक्शन परराज्यात असल्याची साशंकता व्यक्त करण्यात येत आहे.

------

कोट

चार महिन्यांनंतरही अपहरणातील व्यक्तीचा शोध लागला नसल्यास, ते प्रकरण स्थानिक गुन्हे शाखेकडे येते. आमचे एक विशेष पथक त्यासाठी काम करते. मागील सन २०१८ पासून ६४७ जणांचे अपहरण झाले आहे. त्यापैकी ५३९ जणांचा शोध लावण्यास यश आले आहे, तसेच मिसींच्या प्रकरणासाठी एक महिना ऑपरेशन मुस्कान राबविण्यात येते. त्याद्वारे ५५८ पैकी ३९० जणांचा शोध लावला आहे.

- बाळासाहेब खाडे, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर

-------

तीन वर्षांत ५६० जण बेपत्ता

सन २०१८ पासून मे, २०२१ पर्यंत जिल्ह्यात १८ वर्षांवरील ३८७ महिला तर १७३ पुरुष असे एकूण ५६० जण बेपत्ता झाले आहेत. यापैकी १२० पुरुषांचा तर २७२ महिलांचा शोध लावण्यास पोलिसांना यश आले आहे. यांच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखेकडून दरवर्षी एक महिना ऑपरेशन मुस्कान राबविण्यात येते. त्याअंतर्गत अनेकांना शोधण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आहे.