लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : माजी राष्ट्रपती, थोर वैज्ञानिक भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी विज्ञानासोबतच विविध क्षेत्रात देशाला नवीन दृष्टी दिली. त्यांनी १४ फेब्रुवारी २०१४ ला चंद्रपूरला भेट दिली. त्या आठवणी अनेकांच्या मनात कायम असून त्यांचे कार्य प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन केंद्रीय हंसराज अहीर यांनी केले. छायाचित्रकार देवानंद साखरकर यांनी टिपलेल्या डॉ. कलाम यांच्या चंद्रपूर भेटीच्या चित्रसंग्रहाचे प्रकाशन करताना ते बोलत होते.मंचावर आ. नाना श्यामकुळे, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार, महापौर अंजली घोटेकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, उपमहापौर अनिल फुलझेले, जि. प. सभापती ब्रिजभूषण पाझारे आदी उपस्थित होते. डॉ. कलाम यांच्या या अविस्मरणीय भेटीतील विविधांगी छटा दर्र्शविणाऱ्या छायाचित्रांनी उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडते. केंद्रीय गृहराज्यमंत्री अहीर यांच्या खासदार निधीतून चांदा क्लब ग्राउंडवर डॉ. अब्दुल कलाम सभामंडप बांधण्यात येणार आहे. हे मंडप त्यांच्या कार्याला साजेसेच असणार, असेही ना. अहीर यावेळी म्हणाले. डॉ. कलाम हे १४ फेब्रुवारी २०१४ ला चंद्रपूर शहरात आले होते. त्यांच्या आगमनापासून तर परतीच्या प्रसंगापर्यंतचे दुर्मिळ व विलोभनीय छायाचित्रे या संग्रहात समाविष्ट आहेत. हा छायाचित्रसंग्रह बहुमोल ठेवा असल्याचे मत उपस्थितांनी मांडले. संग्रहात केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री शांताराम पोटदुखे, आमदार श्यामकुळे, तत्कालीन जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक तसेच अन्य मान्यवरांचे संदेश आहेत.
अब्दुल कलामांनी दिली नवीन दृष्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 11:01 PM
माजी राष्ट्रपती, थोर वैज्ञानिक भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी विज्ञानासोबतच विविध क्षेत्रात देशाला नवीन दृष्टी दिली. त्यांनी १४ फेब्रुवारी २०१४ ला चंद्रपूरला भेट दिली. त्या आठवणी अनेकांच्या मनात कायम असून त्यांचे कार्य प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन केंद्रीय हंसराज अहीर यांनी केले. छायाचित्रकार देवानंद साखरकर यांनी टिपलेल्या डॉ. कलाम यांच्या चंद्रपूर भेटीच्या चित्रसंग्रहाचे प्रकाशन करताना ते बोलत होते.
ठळक मुद्देहंसराज अहीर : ‘आठवणीतले कलाम’ चित्रग्रंथाचे प्रकाशन