उसळला श्री भक्तांचा जनसागर: रोषणाई व फटाक्यांची आतषबाजीराजकुमार चुनारकर चिमूरअवघ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या चिमूरच्या घोडा रथ यात्रेला ३९० वर्षाचा इतिहास लाभला आहे. त्यामुळे या बालाजी महाराज घोडा रथ यात्रेकरिता पंचक्रोषीतील हजारो भक्त भाविक, आबालवृद्ध मितीमाघ शुद्ध त्रयोदशीच्या रात्री निघलेल्या रात घोडयाच्या मिरवणुकीत सहभागी झालेत. या युवांच्या जल्लोषात व फटाक्याच्या आतषबाजीत भक्तीमय वातावरणात श्री बालाजी महाराजांची मिरवणूक गुरुवारी रात्री साडेबारा वाजता बालाजीच्या मंदिरातून काढण्यात आली.३९० वर्षाचा इतिहास असलेल्या चिमूरच्या घोडा रथयात्रेला १ फेब्रुवारीला सुरुवात झाली. गुरुवारी रातघोड्याच्या मिरवणुकीसाठी तालुक्यासह जिल्ह्यातील नागरिकांनी मिळेल त्या साधनाने प्रसिद्ध चिमूर शहराची वाट धरली. त्यामुळे रात्री अकरापर्यंत चिमुरातील मुख्य रस्ते व मंदिराचा परिसर हजारो श्री बालाजी भक्तांनी गजबजला होता.हा भक्तीमय प्रसंग आपल्या डोळ्यामध्ये साठवण्यासाठी अबालवृद्धासह युवक महिलांचे जत्थे मंदिराच्या परिसरात गर्दी करीत होते. रात्री अकरा- बाराच्या दरम्यान विनोद खोंड यांच्या कीर्तनानंतर शास्त्रोक्त पद्धतीने श्रीहरी बालाजी महाराजांची पूजा पाठ करण्यात आली. या पूजेसाठी डाहुले पाटील यांच्या वंशजांना पूजा करण्याचा मान विश्वस्थ मंडळाकडून देण्यात आला. पुजेनंतर बालाजी महाराजांच्या प्रतिकृतीला लाकडी रथावर अश्वरुढ करुन फटाक्याच्या आतिषबाजीत युवकांच्या गोविंदा... गोविंदाच्या गजरात या रात घोड्याच्या भव्यदिव्य मिरवणुकीस सुरुवात झाली. मिरवणुकीत आ. मितेश भांगडिया, आ. किर्तीकुमार भांगडिया यांच्यासह अनेक पदाधिकारी ही होते.बालाजी महाराजांच्या रात घोड्याची मिरवणूक रात्री बारानंतर सुरु झाली. मिरवणुकीत परिसरातील भजन मंडळ, लेझीम पथकासह गोविंदा - गोविंदाच्या गजरात विश्वस्थ मंडळाचे सदस्य व बालाजी महाराज भक्तमंडळ यांचे स्वयंमसेवक सहभागी झाले होते. ही मिरवणूक मंदिरापासून बालाजी रायपूरकर चौक- नेहरु चौक, अंहिसा चौक, बाजार ओळीतून शिवाजी चौक- डोंगरवार चौकातून मार्गक्रमण करीत श्रीची मिरवणूक पुर्ववत बालाजी मंदिरातील परिसरात आणून या मिरवणुकीची सांगता करण्यात आली. दरम्यान, मिरवणुकीत घोडारथाची विधीवत पूजा यावले चौक व शिवाजी चौकात भांगडिया परिवाराकडून करण्यात आली. तसेच या मिरवणुकीवर नेहरु चौक ते शिवाजी चौकदरम्यान पुष्पवृष्टी करण्यात आली.पोलिसांचा चोख बंदोबस्तरातघोड्यामध्ये सहभागी हजारो भक्ताच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी चिमूर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. सायंकाळी ७ वाजतापासून वाहतूक व्यवस्था शहरातून बंद करण्यात आली होती. भक्ताच्या मदतीकरिता पोलीस मदत केंद्राची व्यवस्था करण्यात आली होती.मनोरंजनासाठी लागले अनेक स्टालयात्रेमध्ये येणाऱ्या भाविकाच्या मनोरंजनासाठी आकाश पाळणे, सर्कस, मौत का कुआ आदी मनोरंजनाचे अनेक केंद्र सुरु करण्यात आले होते.रथ ओढण्यासाठी प्रशिक्षित स्वयंसेवकमंदिरापासून अश्व रथ हा भक्तांच्या हाताने ओढण्यात येत असतो. काही वर्षापूर्वी रथ ओढताना एक अपघात झाला होता. त्यामुळे हा रथ शिस्तबद्ध प्रशिक्षित स्वयंसेवकांकडूनच ओढण्यात आला.ड्रोन कॅमेऱ्याद्वारे व्यवस्थेवर नियंत्रणश्रीच्या रात घोड्याच्या मिरवणुकीत हजारो भक्तांची संख्या लक्षात घेता शांतता सुव्यवस्था व काही अनुचीत प्रकार घडू नये यासाठी मोबाईल व्हॅनवर लावलेल्या ड्रोन कॅमेऱ्याद्वारे नियंत्रण ठेवण्यात येत होते. या कॅमेऱ्यामुळे समाजकंटकांवर नजर ठेवण्यात आली होती.
अबालवृद्ध - युवांच्या जल्लोषात श्रीची मिरवणूक
By admin | Published: February 11, 2017 12:35 AM