लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : आपल्या उपजत काटकपणातून व क्रीडा कौशल्यातून क्रीडा जगताला उत्तम क्रीडापटू मिळावेत. पुढील चार दिवस या मैदानावर नजरेत भरतील, असे विक्रम व्हावेत, अशी अपेक्षा आदिवासी विकास नागपूरचे अप्पर आयुक्त संदीप राठोड यांनी व्यक्त केली. चंद्रपूर येथे आदिवासी विकास विभागाच्या नऊ प्रकल्पाचा शानदार क्रीडा स्पर्धा महोत्सव रविवारपासून सुरू झाला.चार डिसेंबरपर्यंत हा विभागीय क्रीडा स्पर्धेचा कार्यक्रम येथील पोलीस ग्राऊंडवर रंगणार आहे. हजारो विद्यार्थ्यांची उपस्थिती आणि बहारदार संस्कृतिक कार्यक्रम, आदिवासी प्रथा परंपरांचे दर्शन आणि विद्यार्थ्यांचे दर्जेदार पथसंचलन यामुळे या स्पर्धेच्या दमदार प्रारंभाला सुरुवात झाली.या स्पर्धेच्या उदघाटनासाठी आदिवासी विकास नागपूरचे अप्पर आयुक्त डॉ. संदीप राठोड, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, चंद्रपूर व चिमूरचे प्रकल्प अधिकारी व या कार्यक्रमाचे आयोजक केशव बावनकर, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा भामरागडचे प्रकल्प अधिकारी राहुल गुप्ता, नागपूर येथील सहाय्यक आयुक्त दीपक हेडाऊ, सहाय्यक आयुक्त महेश जोशी, वरिष्ठ संशोधन अधिकारी सोनकुसरे, प्रकल्प अधिकारी, देवरी, जितेंद्र चौधरी, प्रकल्प अधिकारी, दिगंबर चव्हाण, सहायक प्रकल्प अधिकारी राचेलवार, नितीन ईसोकार, चंद्रपूरचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी निलय राठोड, बावणे यांच्यासह चिमूर, चंद्रपूर, गडचिरोली, भामरागड, अहेरी, नागपूर, वर्धा, भंडारा, देवरी येथील अधिकारी उपस्थित होते.डॉ .संदीप राठोड यांनी यावेळी उपस्थित क्रीडापटूंना शुभेच्छा दिल्या. जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी यावेळी बोलताना पुढील चार दिवसाच्या कार्यक्रमांना शुभेच्छा दिल्यात. चंद्रपूर जिल्ह्याची या क्रीडा स्पर्धेठी निवड केल्याबद्दल आभार व्यक्त केले. तसेच या स्पर्धेतून दर्जेदार क्रीडापटू प्राप्त व्हावेत व त्यांनी या देशाचे नावलौकिक वाढवावे, असे आवाहनदेखील केले.या कार्यक्रमाच्या सुरुवातीला वेगवेगळ्या विभागातील मुलांच्या विज्ञान प्रदर्शनीचादेखील प्रारंभ करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन चंद्रशेखर दंदे यांनी केले. तर आभार प्रदर्शन सहाय्यक प्रकल्प अधिकारी निलय राठोड यांनी केले. आजपासून सर्व क्रीडा प्रकाराच्या प्राथमिक फेरीलादेखील सुरुवात करण्यात आली. सर्व विभागातील शिक्षकांनी यावेळी मोठया प्रमाणात उपस्थिती दर्शवली होती. पोलीस ग्राऊंडवर यासाठी मोठया प्रमाणात चंद्रपूर प्रकल्प कार्यालयाने व्यवस्था केली असून अनेक विभागाचे अधिकारीदेखील या ठिकाणी सहभागी झाले होते.विज्ञान व चित्रकला प्रदर्शनआदिवासी समाजातील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी त्यांच्या भावी जीवनातील उत्कृष्ट वाटचालीकरिता आणि पारंपरिक कलागुणांच्या संवर्धनाकरिता आदिवासी विकास विभागातील शासकीय व अनुदानित आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या नागपूर विभागांतर्गत १ डिसेंबर ते ४ डिसेंबर या कालावधीत विभागी विज्ञान व चित्रकला प्रदर्शनी आयोजित करण्यात आलेल्या आहेत.
आदिवासी मुले क्रीडा कौशल्याची खाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2019 6:00 AM
चार डिसेंबरपर्यंत हा विभागीय क्रीडा स्पर्धेचा कार्यक्रम येथील पोलीस ग्राऊंडवर रंगणार आहे. हजारो विद्यार्थ्यांची उपस्थिती आणि बहारदार संस्कृतिक कार्यक्रम, आदिवासी प्रथा परंपरांचे दर्शन आणि विद्यार्थ्यांचे दर्जेदार पथसंचलन यामुळे या स्पर्धेच्या दमदार प्रारंभाला सुरुवात झाली.
ठळक मुद्देसंदीप राठोड : आदिवासी विकास विभागाच्या विभागीय क्रीडा स्पर्धेचा शुभारंभ