शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

'मुख्यमंत्री योजनादूत' उपक्रमासाठी जिल्ह्यातून सुमारे १ हजार ८०० अंतिम निवड

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2024 3:51 PM

Chandrapur : अर्जाची मुदत १३ सप्टेंबरपर्यंत वाढविली

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : महाराष्ट्र शासनाच्या 'मुख्यमंत्री योजनादूत' उपक्रमासाठी जिल्ह्यातून सुमारे १ हजार ८०० उमेदवारांची अंतिम निवड करण्यात आली. निवड झालेल्या पात्र उमेदवारांना शासनाकडून दरमहा १० हजार रुपये मानधन देण्यात येईल. त्यामुळे अधिकाधिक उमेदवारांनी नोंदणी करावी, यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम मुदत १३ सप्टेंबर २०२४ पर्यंत वाढविण्यात आली आहे.

शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी 'मुख्यमंत्री योजनादूत' उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांना www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर नोंदणी करावयाची आहे.

योजनादुताच्या निवडीसाठी वयोमर्यादा १८ ते ३५ वयोगट इतकी आहे. उमेदवार कोणत्याही शाखेचा किमान पदवीधर असावा, त्याला संगणकज्ञान आवश्यक आहे. उमेदवाराकडे अद्ययावत मोबाइल असावा. उमेद्वार महाराष्ट्राचा रहिवासी असावा, आधार कार्ड असावे व त्याच्या नावाचे बँक खाते आधार संलग्न असले पाहिजे. योजनादूत निवडीसाठी ऑनलाइन अर्ज करावा.

आधार कार्ड, पदवी उत्तीर्ण असल्याबाबत प्रमाणपत्र, अधिवास दाखला, वैयक्तिक बँक खात्याचा तपशील, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र व हमीपत्र (ऑनलाइन अर्जासोबतच्या नमुन्यात) सादर करावे लागणार आहे. 

अशी असेल कार्यपद्धती 

  • महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि मुख्यमंत्री जन-कल्याण कक्षमार्फत हा उपक्रम राबविण्यात येईल. कार्यरत प्रशासकीय यंत्रणेच्या मदतीसाठी योजनादूत नेमले जातील. 
  • ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचाय- तीसाठी एक व शहरी भागात पाच हजार लोकसंख्येसाठी एक योजनादूत या प्रमाणात राज्यात एकूण ५० हजार योजनादुतांची निवड होणार आहे. 
  • मुख्यमंत्री योजनादुतास प्रत्येकी १० हजार प्रतिमहिना एवढे मानधन देण्यात येणार आहे. निवड झालेल्या मुख्यमंत्री योजनादुता- सोबत सहा महिन्यांचा करार केला जाणार आहे.
टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरgovernment schemeसरकारी योजना