लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : अमृत कलश योजने अंतर्गत खोदलेले रस्ते पहिले दुरुस्त करा, नंतर नवीन खोदकाम करा, अशी मागणी किशोर जोरगेवार यांनी केली होती. त्यानंतर दोन दिवस काम बंद ठेवून रस्त्यांची डागडुजी केली जात होती. मात्र आज पुन्हा तुकुम परिसरात नवीन खोदकाम सुरू करण्यात आले. मात्र याची माहिती होताच किशोर जोरगेवार यांनी शनिवारी हे काम बंद पाडून खोदलेला रस्ता कंत्राटाराकडून व्यवस्थित करुन घेतला.अमृत कलश योजनेच्या नावावर शहरातील संपूर्ण रस्त्यांचे खोदकाम करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे पहिले खोदलेले रस्ते दुरुस्त करा. नंतरच नवीन खोदकाम सुरू करा, अशी मागणी किशोर जोरगेवार यांनी केली होती. या मागणीकरिता महापालिकेसमोर आंदोलनही करण्यात आले होते. त्यानंतर दोन दिवस कामबंद ठेवल्यानंतर शनिवारी पुन्हा कंत्राटदाराने तुकूम येथील रस्त्याच्या खोदकामाला सुरुवात केली. याची माहिती मिळताच किशोर जोरगेवार यांनी कार्यकर्त्यांसह हा परिसर गाठून सुरु असलेले खोदकाम बंद पाडले. यावेळी स्थानिक नागरिकांनीही जोरगेवार यांच्या या भूमिकेचे समर्थन करुन पहिले रस्ते दुरुस्त करावे, अशी मागणी केली.यावेळी जोरगेवार यांनी कंत्राटाराकडून खोदलेला रस्ता व्यवस्थित करुन घेतला. अमृत कलश योजनेच्या नावावर कंत्राटदार मनमानी कारभार करत आहे. शहरातील पुर्ण रस्ते खोदून शहराचे विदृपीकरण करण्यात आले आहे. खोदलेले रस्ते व्यवस्थित न करता पुन्हा नवीन रस्ते खोदण्याचे काम कंत्राटदाराकडून केले जात आहे. त्यामुळे नागरिकांना प्रंचड त्रास सहन करावा लागत आहे. आधी खोदलेल्या रस्त्यांची डागडुजी करा, नंतरच नवीन खोदकाम करा, या भूमिकेवर जोरगेवार ठाम असून आज काम बंद पाडल्यानंतर संबधित कंत्राटदारानेही खोदलेल्या रस्त्यांची डागडुजी केल्याशिवाय पुढील काम करणार नाही, असे आश्वासन जोरगेवार यांना दिले आहे.
अमृत योजनेचे खोदकाम बंद पाडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 10:21 PM
अमृत कलश योजने अंतर्गत खोदलेले रस्ते पहिले दुरुस्त करा, नंतर नवीन खोदकाम करा, अशी मागणी किशोर जोरगेवार यांनी केली होती. त्यानंतर दोन दिवस काम बंद ठेवून रस्त्यांची डागडुजी केली जात होती. मात्र आज पुन्हा तुकुम परिसरात नवीन खोदकाम सुरू करण्यात आले. मात्र याची माहिती होताच किशोर जोरगेवार यांनी शनिवारी हे काम बंद पाडून खोदलेला रस्ता कंत्राटाराकडून व्यवस्थित करुन घेतला.
ठळक मुद्देकिशोर जोरगेवार : रस्ते व्यवस्थित करा, मगच खोदकाम करा