लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : यावर्षी तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. जून महिना अर्धा संपला तरीही तापमानात फरक पडला नाही. शेतीच्या खरीप हंगामातील पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना काही प्रमाणात सुरुवात झाली. मात्र अजूनही मान्सूनचे आगमन झाले नाही त्यामुळे पाऊस पडणार की नाही, असा प्रश्न बळीराजाला पडला आहे.रोहिणी व मृग नक्षत्रात पावसाने दगा दिला. तसेच तापमानात सातत्याने वाढ होत असल्याने स्वाती नक्षत्रातही उन्हाच्या झळांनी बळीराजाला असह्य वेदना होत आहेत. रोहिणी नक्षत्राच्या शेवटी-शेवटी पावसाच्या हलक्या सरी आल्या. परंतु वातावरणात गारवा निर्माण करण्यासाठी त्या अपुऱ्या ठरल्या आहेत. आता मृग नक्षत्र संपून स्वाती नक्षत्राला सुरुवात झाली. परंतु. वातावरणात तसूभरही बदल जाणवत नाही. उलट उकाळा मात्र भयानक वाढलेला आहे. एप्रिल-मे महिन्यात थंडावा देणाºया कुलरची हवा गरम जाणवत आहे. पाऊस पडेल की नाही, याचा हवामान खात्याचा अंदाजही चुकीचा ठरत आहे. शेतकरी शेतीच्या मशागतीला लागला असून शेतातील कचरा काढणे, माती टाकणे, बियाण्यांची खरेदी आदी कामे आटोपली आहेत. मात्र पावसाने पाठ फिरवल्याने बळीराजा चातकासारखी वाट पाहत आहे. पाऊस आला नाही तर मोठे नुकसान होऊ शकते.नद्या, नाले, तलाव कोरडेजून महिन्यात साधारणता मान्सुन पडत असतो. मात्र जनू महिना अर्धवट संपला तरीसुद्धा पावसाने हजेरी लावली नाही. त्यामुळे तालुक्यातील लहान-मोठे नाले, तलाव, बंधारे, विहिरी कोरडी पडली आहेत. त्यातच बारमाही वाहणारी वैनगंगा नदी अगदी शांत असून कोरडी पडल्यागत जमा होत आहे. त्यामुळे पाण्याची पातळी खोल गेली आहे. परिणामी पुन्हा भिषण जलसंकट निर्माण होण्याची शक्यता दिसून येत आहे.