शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाला धक्का; डोंबिवलीतील नाराजीचा शिंदे गटाला फायदा
2
Maharashtra Election 2024: ‘या’ मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार लढवत नाहीये निवडणूक! काय आहेत कारणे?
3
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
4
Baba Siddique : ऑपरेशन बाबा सिद्दिकी डिकोड: App ने कॉन्टॅक्ट, जेलमधून शूटर्सचा इंटरव्ह्यू...; 'असा' रचला कट
5
T20I Record : टीम इंडियानं वर्ष गाजवलं अन् पाकिस्तानच्या संघानं 'लाजवलं'
6
पाकिस्तानात हाहा:कार! नऊ दहशतवाद्यांचा खात्मा, सात सुरक्षारक्षक ठार, सात पोलीस 'किडनॅप'
7
वंचितचे कळमनुरी मतदारसंघातील उमेदवार डॉ. दिलीप मस्के यांच्यावर हल्ला
8
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
9
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
10
नीरव मोदी-विजय माल्ल्यावर कारवाई होणार! PM मोदींनी ब्रिटनसमोर उपस्थित केला मुद्दा
11
ऐन निवडणुकीत पक्षाकडून निलंबन; सांगता सभेत शरद पवारांबद्दल काय म्हणाले राहुल जगताप?
12
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
13
मराठी-हिंदी गाणी गाणाऱ्या प्रसिद्ध गायकाने गमावलेला आवाज, २ वर्षांनी केला खुलासा
14
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."
15
कश्मिरा शाहचा अपघात नक्की कसा झाला? नणंद आरती सिंहने दिली माहिती; म्हणाली, "मॉलमध्ये..."
16
Mohammed Shami च्या फिटनेस टेस्टसाठी BCCI नं सेट केला नवा पेपर
17
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
18
मोदी-ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; सोलापुरात कुठे कोणत्या नेत्याच्या सभा झाल्या? जाणून घ्या
19
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
20
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video

Coronavirus in Chandrapur; ॲन्टिजन रिपोर्ट असेल तरच मिळेल ट्रॅव्हल्समध्ये प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 8:26 PM

Chandrapur news लॉकडाऊनमुळे प्रवासावरही निर्बंध आहेत. परंतु, अत्यावश्यक सेवेसाठी काही खासगी ट्रॅव्हल्स धावत आहेत. ज्या प्रवाशांकडे ॲन्टिजन रिपोर्ट निगेटिव्ह असेल त्यालाच ट्रॅव्हल्स बसमध्ये बसण्याची परवानगी आहे. त्यातही मास्क व सॅनिटायझर बंधनकारक आहे.

ठळक मुद्देखासगी ट्रॅव्हल्सवाल्यांना कोरोनाची धास्तीसॅनिटायझर, मास्क बंधनकारक

लोकमत न्यूज नेटवर्क

चंद्रपूर : लॉकडाऊनमुळे प्रवासावरही निर्बंध आहेत. परंतु, अत्यावश्यक सेवेसाठी काही खासगी ट्रॅव्हल्स धावत आहेत. ज्या प्रवाशांकडे ॲन्टिजन रिपोर्ट निगेटिव्ह असेल त्यालाच ट्रॅव्हल्स बसमध्ये बसण्याची परवानगी आहे. त्यातही मास्क व सॅनिटायझर बंधनकारक आहे.

प्रवासी उतरल्यानंतर त्याच्या हातावर गृह विलगीकरणाचे शिक्के मारण्यात येत आहेत. कोरोनामुळे सर्वच व्यवहार ठप्प झाले. याची झळ खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांनाही बसली आहे. कोरोनामुळे प्रवासी संख्या घटली आहे. त्यामुळे ट्रॅव्हल्समालकांनी लांब पल्ल्याच्या फेऱ्यांमध्ये घट केली आहे. कोरोनापूर्वी चंद्रपूर येथून डीएनआर, पर्पल, हमसफर, गणराज, महाकाली अशा अनेक ट्रॅव्हल्स कोरोनापूर्वी मोठ्या प्रमाणात धावत होत्या. परंतु, आता त्याला मर्यादा आली आहे. चंद्रपूरवरुन केवळ नागपूर व पुणेसाठी दहाच्या जवळपास ट्रॅव्हल्स धावत आहेत. बाकी ट्रॅव्हल्स मागील दोन महिन्यांपासून बंदच आहेत. परिणामी कोरोनामुळे हा व्यवसाय डबघाईस आला आहे. प्रवासी मिळाल्यास एखादी फेरी धावते. त्यातही मोजक्याच प्रवाशांना प्रवेश असल्याने उत्पन्नही मिळत नाही. त्यामुळे चालक, क्लीनरचा पगार कसा करायचा असा प्रश्न दर महिन्याला ट्रॅव्हल्स मालकांना पडत आहे. दरम्यान, प्रवास करताना प्रवासीही स्वत:ची काळजी घेत मास्क व सॅनिटायझरचा वापर करीत आहेत. चंद्रपूरवरून नागपूरकडे धावणाऱ्या एका ट्रॅव्हल्समध्ये पाहणी केली असता यामध्ये मोजकेच प्रवासी आढळून आले. तसेच प्रवाशांनी मास्क वापरल्याचे दिसून आले.

मास्कचा होतोय वापर

शहरातून लांब पल्ल्याच्या धावणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सची पाहणी केली असता यामध्ये प्रवाशांनी मास्कचा वापर केल्याचे पाहावयास मिळाले. तसेच एका सीटवर एकच प्रवासी बसलेला होता. कोरोनामुळे प्रत्येकजण आपापल्या जागेची काळजी घेत असल्याचे यावेळी दिसून आले.

कारवाईसाठी नेमले पथक

खासगी ट्रॅव्हल्समध्ये कोरोना नियमांचे पालन होते की नाही, याची पाहणी करण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने एका पथकाची नियुक्ती केली आहे. ट्रॅव्हल्सधारकांकडून नियमांचे उल्लंघन झाल्यास त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येते.

ई-पास बंधनकारक

परजिल्ह्यात प्रवासी वाहतूक करावयाची झाल्या ई-पास बंधनकारक करण्यात आला आहे. जर प्रवाशांकडे इ-पास नसेल तर त्याच्या ॲन्टिजन चाचणीचा अहवाल, आधार कार्ड आवश्यक आहे. तेव्हाच त्याला ट्रॅव्हल्समध्ये प्रवेश दिला जात असल्याचे एका ट्रॅव्हल्समालकांनी सांगितले.

 

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस