आॅनलाईन लोकमतचंद्रपूर: येथील वेकोलीच्या माजरी येथील जुना कुणाडा कोळसा खाणीत शुक्रवारी मध्यरात्री १ च्या सुमारास जवळपास अर्धा किलोमीटर अंतराचा मातीचा ढिगारा कोसळला. या विस्तीर्ण ढिगाऱ्याखाली दबलेल्या अनेक कामगारांपैकी फक्त तिघांना बाहेर काढण्यात यश आले आहे. त्या तिघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना रात्रीच नागपूरला हलविण्यात आले.मागील आठवड्यात याच परिसरातील तेलवासा खाणीत अशाच प्रकारची घटना घडली होती. तीत एका कामगाराचा मृत्यू झाला होता. जुना कुणाडा कोळसा खाणीत मध्यरात्री घडलेली ही घटना अधिक मोठ्या स्वरुपाची व गंभीर आहे. या ढिगाºयाखाली ८ व्हॉल्व्हो टिप्पर, दोन ड्रिल मशीन्स, ४ पीसी मशीन, एक सर्व्हिसिंग गाडी आणि असंख्य कामगार दबले असावेत अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मदतकार्य वेगाने सुरू असून लवकरच पुढील वृत्त देत आहोत.
अपघात ! चंद्रपुरातील कोळसा खाणीत मातीचा ढिगारा कोसळला; अनेक कामगार दबल्याची भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2017 9:38 AM
येथील वेकोलीच्या माजरी येथील जुना कुणाडा कोळसा खाणीत शुक्रवारी मध्यरात्री १ च्या सुमारास जवळपास अर्धा किलोमीटर अंतराचा मातीचा ढिगारा कोसळला.
ठळक मुद्देमागील आठवड्यात याच परिसरात घडली होती अशीच घटनाखाण कामगारांच्या जिविताच्या रक्षणावर प्रश्नचिन्ह