छायाचित्र
चंद्रपूर : देशात मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने विद्यापीठ स्तरावर आचार्य पदवी करता संशोधन करण्यासाठी अनेक अडचणी निर्माण झाल्या. विहित मुदतीत अनेक संशोधकांना शोधप्रबंध सादर करता आले नाही. त्यामुळे प्रबंध सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी गोंडवाना यंग टीचर्स असोसिएशनच्या शिष्टमंडळाने गोंडवाना विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. अनिल चिताडे यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
कोरोना महामारीमुळे अडचणी लक्षात घेऊन विद्यापीठ अनुदान आयोगाने देशपातळीवर संशोधकांना प्रबंध सादर करण्यास सहा महिन्याची मुदतवाढ दिली. ही मुदतवाढ मिळावी गोंडवाना विद्यापीठातील संशोधक प्राध्यापकांना मिळावी, याकरिता यंग टीचर असोसिएशन प्रयत्नशील होते. कोरोना व टाळेबंदी प्रयोगशाळा, ग्रंथालय, संशोधन क्षेत्रामध्ये जाऊ न शकल्याने अनेक अडचणी निर्माण झाल्या. या पार्श्वभूमीवर शिष्टमंडळाने कुलसचिव डॉ. चिताडे यांचे लक्ष वेधले. शिष्टमंडळामध्ये गोंडवाना यंग टीचर्स असो. सचिव प्रा. विवेक गोरलावर, उपाध्यक्ष डॉ. नंदाजी सातपुते, सहसचिव डॉ. प्रमोद बोधाने महिला आघाडी प्रमुख डॉ. लता सावरकर, सदस्य प्रा. किशोर कुडे विभाग समन्वयक डॉ.राजेंद्र गोरे तसेच डॉ.वनिता बंजारी सोशल मीडिया प्रमुख प्रा रुपेश कोल्हे व प्रा. संजय राऊत या सर्व मान्यवर मंडळींचा समावेश होता.
कोट
गोंडवाना विद्यापीठातून आचार्य पदवीचे संशोधन करणा-या संशोधकांची समस्यागोंडवाना यंग टीचर्स असोसिएशनच्या शिष्टमंडळाने मांडली. याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेण्यात येणार आहे.
-डॉ. अनिल चिताडे, प्रभारी कुलसचिव गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली.