शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

बुके विक्रेत्यांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2019 10:06 PM

प्लास्टिक बंदी असताना प्लास्टिक कव्हर केलेली बुके विकली जात असल्याची माहिती मिळाल्यावरून मनपाच्या पथकाने शहरातील सात बुके विक्रेत्यांवर कारवाई केली. त्यांच्याकडून साडे तीन हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. प्लास्टिक निर्मुलनासाठी महानगरपालिकेने पुन्हा एकदा कंबर कसली आहे.

ठळक मुद्देप्लास्टिक कव्हर केलेली बुके जप्त : साडे तीन हजारांचा दंड वसूल

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : प्लास्टिक बंदी असताना प्लास्टिक कव्हर केलेली बुके विकली जात असल्याची माहिती मिळाल्यावरून मनपाच्या पथकाने शहरातील सात बुके विक्रेत्यांवर कारवाई केली. त्यांच्याकडून साडे तीन हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. प्लास्टिक निर्मुलनासाठी महानगरपालिकेने पुन्हा एकदा कंबर कसली आहे.राज्यात प्लास्टिक बंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे प्लास्टिक वापरणे गुन्हा असतानाही शहरात प्लास्टिकचा सर्रास वापर केला जात आहे. प्लास्टिकच्या पत्रावळी, द्रोण, ग्लास, वाटींची खुलेआम बाजारात विक्री सुरू आहे. बाजारातही मोठ्या प्रमाणात प्लास्टिक वापर सुरू आहे. बुके कव्हरसाठीही प्लास्टिकचा वापर केला जात आहे. दरम्यान, काही फुल विक्रेते बुके कव्हरसाठी प्लास्टिक वापरत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर मनपाने या फुलविक्रेत्यांविरुद्ध कारवाईची मोहीम सुरू केली. शुक्रवारी गांधी चौक, गोल बाजार, जटपुरा गेट परिसरातील सात व्यावसायिकांवर कारवाई करताना प्लास्टिक कव्हर केलेले ६० बुके जप्त करण्यात आले. प्रत्येक विक्रेत्यांवर प्रत्येकी ५०० रुपये दंड आकारण्यात आला. आयुक्त संजय काकडे यांच्या मार्गदर्शनात अतिक्रमण विभागाचे प्रमुख नामदेव राऊत यांच्या पथकाने ही कारवाई केली. या कारवाईमुळे फुलविक्रेत्यंमध्ये एकच खळबळ उडाली आहे.मोहिमेचा फज्जाराज्यात प्लास्टिक बंदी असून चंद्रपूर शहरातही काही दिवसापूर्वी मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. मात्र मागील काही दिवसांपासून ही मोहिमे थंडावली असून गोलबाजार, बंगाली कॅम्प परिसरात खुलेआम भाजीविक्रेते प्लास्टिक पिशव्या ग्राहकांना देत आहे. मात्र यांच्यावर कारवाई होताना दिसत नाही.