अनियमितता भोवणार : परवानगी नाहीवरोरा : मागील काही दिवसांत तालुकास्तरीय शासकीय पथकाने वरोरा तालुक्यातील खासगी रुग्णालयांची तपासणी केली. त्यामध्ये अनेक खाजगी रुग्णालये नियमबाह्य सुरू असल्याचे तपासणी पथकाला आढळून आले. ११ खाजगी रुग्णालयावर कारवाई करण्याचे संकेत प्राप्त झाले असून त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.वरोरा शहर व ग्रामीण भागामध्ये ४८ खाजगी रुग्णालये आहेत. त्यात चार नर्सिंग होमचाही समावेश आहे. या खाजगी रुग्णालयाची तालुकास्तरीय शासकीय समितीने नुकतीच तपासणी केली. त्यामध्ये त्यांची बॉम्बे नर्सिंग अॅक्टनुसार नोंदणी नसल्याचे आढळून आले आहे. रुग्णालयात रुग्णांना खाटेवर (पलंगावर) ठेवून उपचार केले जातात. परंतु त्यांच्याकडे पलंगावर उपचार करण्याचा परवाना नाही. काही रुग्णालयांकडे तो परवाना असला तरी त्याचे नूतनीकरण करण्यात आलेले नाही. नियमबाह्य शस्त्रक्रिया गृह चालवून त्यात शस्त्रक्रिया केली जात आहे. अनेक रुग्णालयांकडे निर्जंतुकीकरण केल्याचा अहवाल उपलब्ध नाही. या शस्त्रक्रिया गृहामध्ये डोळ्यांच्या शस्त्रक्रियेनंतर काही खाजगी रुग्णालयात हॉयड्रोसिलची शस्त्रक्रिया बिनधोकपणे केली जाते, केले जाते, हे विशेष. अनेक रूग्णालयात प्रशिक्षण घेतलेला पुरेसा कर्मचारी वर्गही नाही. अशा विविध त्रुटी ११ खाजगी रुग्णालयात आढळून आल्या आहेत.(शहर प्रतिनिधी)डिग्री सुरू असताना पूर्ण झाल्याचे फलकावर काही खाजगी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रॅक्टीस करताना खाजगीरीत्या उच्च शिक्षण सुरू ठेवले. परंतु ते शिक्षण सुरू असताना ते पूर्ण केल्याचे फलकावर नमूद केले आहे. त्याचवेळी प्रमाणपत्राची मागणी केली असता उडवा - उडवीची उत्तरे देण्यात आली.चाहूल लागताच बेड पळविलेशासकीय तपासणी पथक येण्याची चाहूल लागताच विनापरवाना बेडवर उपचार करणाऱ्या रुग्णालयाने काही तासातच चक्क बेड हटवून रुग्णांना बेडवर उपचार करीत नसल्याचा आभास निर्माण केला.बोगस डॉक्टर भूमिगतमागील काही दिवसांपासून शासकीय तपासणी पथक खाजगी रुग्णालयाच्या तपासणीकरिता सक्रीय झाल्याची कुणकुण बोगस डॉक्टरांना लागली. त्यांनी आपली रुग्णालये बंद करून ते भूमिगत झाले आहेत.वरोरा तालुक्यातील खाजगी रुग्णालयांची तपासणी करून त्याचा अहवाल जिल्हास्तरीय चमूकडे सादर करण्यात आला आहे. तो अहवाल कारवाईची दिशा ठरविणार आहे.डॉ.जी.डब्ल्यू. भगत, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, वरोरा
वरोरा तालुक्यातील ११ खासगी रुग्णालयावर कारवाई होणार
By admin | Published: April 19, 2017 12:39 AM