चंद्रपूर : महाराष्ट्रामध्ये पुन्हा कोरोना नव्याने डोके वर काढू पाहतो आहे. अनेक शहरांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसून येतो आहे; परंतु लोकांचे मास्क वापरणे, गर्दी टाळणे याकडे दुर्लक्ष होत आहे. कोरोना वाढत असेल तर याला आपणच जबाबदार असेल. आम्ही नवे घोष वाक्य दिले आहे ते म्हणजे ‘कोरोना वाढीस मीच जबाबदार’. असे म्हणण्याची पाळी आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील जनतेला नम्रपणे आवाहन करतो आहे की, माझे कुटुंब माझी जबाबदारी समजून या संकटाला तोंड द्यावे लागणार आहे. परिस्थिती आटोक्यात आहे; परंतु सर्वांनी काळजी नाही आणि सरकारच्या निर्देशाचे पालन केले नाही तर नव्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे. धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम टाळावे. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. अन्यथा मास्क न वापरता गर्दीच्या ठिकाणी आढळल्यास कारवाईचे निर्देशसुद्धा प्रशासनाने दिले आहे.- विजय वडेट्टीवार, पालकमंत्री, चंद्रपूर जिल्हा.
गर्दीच्या ठिकाणी मास्क नसल्यास कारवाई होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 4:30 AM