राजुरा : आगामी होऊ घातलेल्या नगरपंचायत व ग्रामपंचायत निवडणुकी संदर्भात भारतीय जनता पार्टीच्या वतीने राजुरा येथे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार ॲड. संजय धोटे व माजी आमदार सुदर्शन निमकर उपस्थित होते.
यावेळी संजय धोटे यांनी भारतीय जनता पार्टीच्या ग्रामीण तसेच शहरी भागातील कार्यकर्त्यांनी आगामी होऊ घातलेल्या नगरपंचायत व ग्रामपंचायत निवडणुकीकरिता पूर्ण शक्तीने कामाला लागण्याचे आवाहन केले. भारतीय जनता पक्ष हा आपल्या भागात मजबूत असून, पक्ष संघटन, बुथप्रमुख यांची नियुक्ती करण्यात भर द्यावी. कार्यकर्त्यांनी जनतेपर्यंत पोहचून त्यांच्या समस्या जाणून घ्यावा, केंद्र सरकारच्या योजनांची माहिती पोहोचवावी. तसेच जिवती नगरपंचायत क्षेत्रात बुथ रचना करावी, पक्षात येणाऱ्या कार्यकर्त्यांना सामावून घावे. तसेच तत्कालीन राज्य सरकारच्या माध्यमातून आपल्या क्षेत्रात झालेल्या विकासकामाची माहिती द्यावी, अशा अनेक बाबींवर मागदर्शन केले.