आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : शासनाने ३० जानेवारीला जारी केलेला अध्यादेश रद्द करुन शंभर टक्के शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याची मागणीचे निवेदन राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मगास प्रवर्ग कल्याण विभागाने ३० जानेवारीला नव्या अद्यादेश जारी केला. यामध्ये विद्यार्थ्यांच्या खात्यात मंजूर झालेल्या ५० टक्के रक्कमेच्या ६० टक्के रक्कम म्हणजेच ३० टक्के रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. हा निर्णय ओबीसी विद्यार्थ्यांना अन्यायकारक आहे. सामाजिक न्याय विभागाने शंभर टक्के रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला.तसाच निर्णय ओबीसी मंत्रालयाने घेऊन शासनाचा ३० जानेवारीचा अद्यादेश रद्द करुन शंभर टक्के शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करावी, अन्यथा राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे आंदोलन करण्यात येईल अशा आशयाचे निवेदन राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे जिल्हाधिकारीमार्फंत मुख्यमंत्र्यांना पाठविले. निवेदन देणाºया शिष्टमंडळात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष प्रा. डॉ. बबनराव तायवाडे, कार्याध्यक्ष डॉ. खुशालचंद बोपचे, महासचिव सचिन राजुरकर, समन्वय प्राचार्य डॉ. अशोक जीवतोडे, बबनराव फंड, रविंद्र टोंगे, संजय देवाळकर, जितेंद्र भोयर, प्रवीण चवरे आदी उपस्थित होते.विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या प्रतीक्षेतविद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासनातर्फे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते. मात्र सन २०१६-२०१७ या शैक्षणिक वर्षाची शिष्यवृत्ती अजूनही प्रलंबीत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यास अडचण जात असून प्रलंबीत शिष्यवृत्ती त्वरीत देण्याची मागणी विद्यार्थी व पालकांकडून करण्यात येत आहे.
शंभर टक्के शिष्यवृत्ती जमा करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 11:11 PM
शासनाने ३० जानेवारीला जारी केलेला अध्यादेश रद्द करुन शंभर टक्के शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याची मागणीचे निवेदन राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
ठळक मुद्देराष्ट्रीय ओबीसी महासंघ : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन