जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या २५ हजार ३९२ वर पोहोचली आहे. सुरूवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या २३ हजार ९१० झाली आहे. सध्या एक हजार ७५ बाधितांवर उपचार सुरू आहेत. दोन लाख ४३ हजार ५६७ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी दोन लाख १४ हजार४९३ नमुने निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ४०७ बाधितांचे मृत्यू झाले. यापैकी जिल्ह्यातील ३६८, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली १९, यवतमाळ १६, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.
चंद्रपुरात ३० व भद्रावती २२ रूग्ण
आज बाधित आढळलेल्या १२८ रूग्णांमध्ये चंद्रपूर मनपा क्षेत्रातील ३०, चंद्रपूर तालुका १५, बल्लारपूर चार, भद्रावती २२, ब्रह्मपुरी तीन, नागभिड पाच, सिंदेवाही १०, मूल सहा, सावली दोन, गोंडपिपरी दोन, राजुरा दोन, चिमूर सात, वरोरा १७, कोरपना दोन व इतर ठिकाणच्या एका रूग्णांचा समावेश आहे.