आक्षेपावर कार्यवाही नाही : प्रशासनाचे दुर्लक्षनागभीड : येथील नगर परिषदेंतर्गत येत असलेल्या बाम्हणी येथील मतदार यादीत समाविष्ट असलेली ‘ती’ ३८ नावे कुठून आली आणि ती कशाकरिता, असा एक यक्षप्रश्न बाम्हणीवासीयांना पडला आहे.बाम्हणी हे गाव नागभीड लगत असून या गावाला नागभीड नगर परिषदेत समाविष्ट करण्यात आले आहे. तत्पूर्वी आॅगस्ट २०१५ मध्ये या ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक घेण्यात आली होती. त्यावेळी सुद्धा या नावांचा या मतदार यादीत समावेश होता, अशीही माहिती मिळाली आहे.प्राप्त माहितीनुसार आशुतोष सिद्धनाथ पाठक, दारासिंग सुरजाराम दायना, ओजल येलय्या इगढी, हिरेन अरविंद वाच्छाणी, मारोती भिवा खुजे, तहमीद हमीद शेख, अप्पानी राजनाथ कुमार, दिनेश देवानंद परचाके, दिनेश शिवलाल साहू, साईनाथ जंगा कुळमेथे, विनोद वामन बांदेकर, सुनील ग्यार्सिलाल दैय्या, संपत दुर्ग्या, भीमकरी, सुरज शंकर भीमेकर, रविंद्र लक्ष्मण दादा, सुरेंद्र दत्ताजी पाईकराव, दायना मुकेश सुरजामल, नागराज अन्जै एल्कापल्ली, विकास सुनील खंडारे, फिरोज बब्बू शेख, सय्यद जाकीर हुसेन, शंकर देवानंद परचाके आदी या मतदारांची नावे आहेत.बाम्हणी हे गाव पुर्णत: मराठी असून मतदार यादीत मात्र अनेक अमराठी व्यक्तींची नावे आली आहेत. यात आणखी एक उल्लेखनीय बाब म्हणजे, ग्रा.पं.च्या निवडणुकी अगोदर मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली तेव्हा या यादीवर आक्षेप घेण्यात आला होता. मात्र तेव्हा या आक्षेपावर कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. (तालुका प्रतिनिधी)
बाम्हणीच्या मतदार यादीत ३८ जणांची नावे अतिरिक्त
By admin | Published: June 13, 2016 2:30 AM