शहरं
Join us  
Trending Stories
1
सारे अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात, मुकेश अंबानींनी तर अमेरिकेतच पैसा ओतला... मोठी डील...
2
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
3
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
4
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
5
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
6
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
7
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
8
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
9
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
10
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
11
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
12
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
13
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
14
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
15
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
16
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
17
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
18
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
19
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
20
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम

आदिवासीबांधव उतरले रस्त्यावर

By admin | Published: December 11, 2015 1:35 AM

कन्हारगाव-गणपूर-झरण गट ग्रामपंचायतीतील आदिवासी बहुल जनता मागील अनेक वर्षांपासून विकासापासून कोसो दूर आहे. या गावात समस्यांचा डोंगर उभा आहे.

गणपूर, कन्हारगावच्या समस्या सोडवा : झरण येथे रास्ता रोको व मोर्चा कोठारी : कन्हारगाव-गणपूर-झरण गट ग्रामपंचायतीतील आदिवासी बहुल जनता मागील अनेक वर्षांपासून विकासापासून कोसो दूर आहे. या गावात समस्यांचा डोंगर उभा आहे. रस्ते, आरोग्य, शिक्षण व रोजगाराच्या विविध समस्या या परिसरात असून शासनस्तरावरून समस्या निकाली काढण्यासाठी कोणतीही उपाययोजना होत नाही. तर या भागातील ४८ गावातील जनतेला रोजगारापासून वंचित ठेवण्याकरिता कन्हारगाव अभयारण्य घोषीत करण्याचा शासनाचा डाव आहे. या मागण्यांसाठी गुरूवारी धरण येथे मोर्चा व रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यात शेकडो आदिवासीबांधवांचा सहभाग होता. शासनाविरूद्ध घोषणा देत एक तास रस्ता रोको करून वाहतूक थांबविण्यात आली. मोर्चाचे नेतृत्व साईनाथ कोडापे, राजु जुनघरे, सरपंच मंगला मडावी, उपसरपंच प्रदीप कुळमेथे, विनोद कुळमेथे, पशुराम कुमरे, किसोर मडावी यांनी केले. गोंडपिपरीचे नायब तहसीलदार सुनिल गावंडे, मंडळ निरीक्षक ए. आर. तिराणकर यांना निवेदन दिले. या मोर्चात साईनाथ कोडापे, राजु जुनघरे, मंगला मडावी, हर्षा चांदेकर, प्रदीप कुळमेथे यांनी मार्गदर्शन केले. आंदोलन यशस्वीतेसाठी सहदेव कुमरे, शालु आत्राम, सुनंदा कोडापे, मनोज बोरूले, चेतन दुर्गे, साईनाथ गावंडे, सत्यपाल मडावी, गणपती पेंदोर आदींनी सहकार्य केले. आंदोलनात गणपूर, कन्हारगाव झरण येथील नागरिक सहभागी झाले होते. मोर्चा दरम्यान कोठारीचे ठाणेदार अरविंदकुमार कतलाम, विरूर स्टे.चे ठाणेदार गव्हाणे यांनी कर्मचाऱ्यांसह बंदोबस्त ठेवला. (वार्ताहर)या आहेत प्रमुख मागण्याझरण-कन्हारगाव रस्त्याचे डांबरीकरण करणे, कन्हारगाव अभयारण्य घोषीत न करणे, कन्हारगाव-चिपडा रस्ता खडीकरण करणे, आदिवासींना गावठाण मंजूर करणे, झरण-गणपूर-कन्हारगाव गावे कोठारी प्राथमिक आरोग्य केंद्रास व कोठारी पोस्टास जोडणे, सामूहीक वनहक्क दावे त्वरीत निकाली काढावे.