आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : आदिवासींनी जल, जंगल व जमीन सुरक्षित ठेवण्यासाठी प्रचंड संघर्ष केला. निसर्ग हेच त्यांच्या जगण्याचे प्रमुख साधन असून हे हक्क डावलणाऱ्या शक्तींविरुद्ध लढा दिला. हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातूनही दिसून आले. त्यामुळे या इतिहासापासून बोध घ्यावा, असे प्रतिपादन विचारवंत, लेखिका विजया खंडाते यांनी केले. वामनपल्ली येथे वीर बाबुराव शेडमाके गोंड सगामांदी शाखेच्या वतीने रविवारी पार पडलेल्या गोंडी धर्म संमेलन व समाज प्रबोधन कार्यक्रमात त्या बोलत होत्या.जि. प. सदस्य गोदरू पाटील जुमनाके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते बाबुराव मडावी यांनी उद्घाटन केले. मंचावर प्रा. धीरज शेडमाके, योगेश कोडापे, निरंजन मेश्राम, राजे विश्वेराव आत्राम, माजी सरपंच सुमन गेडाम, संतोष मेश्राम, ज्ञानेश्वर आत्राम, श्यामराव शेडमाके, वाढीवा, नामदेव किन्नाके व अन्य मान्यवर उपस्थित होते. बाबुराव मडावी यांनीही मार्गदर्शन केले. प्रा. शेडमाके यांनी गोंडवाना व गोंडी धर्म चळवळीची माहिती दिली. संघटनेचे मुख्य संघटक तथा माजी सरपंच साईनाथ कोडापे म्हणाले, आदिवासींनी जीवनाच्या सर्व क्षेत्रात प्रगती करण्यासाठी शिक्षणाकडे लक्ष दिले पाहिजे. अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी संघटन शक्ती बळकट करावे, असेही सांगितले. संघटनेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. विविध सत्रांमध्ये मान्यवरांनी विविध विषयांवर विचार मांडले. रात्री गोंडी ढेमसा नृत्य स्पर्धा पार पडली. संचालन आकाश कडूकर यांनी केले. यावेळी लाठी ठाण्याचे ठाणेदार राठोड, सुमन गेडाम व अन्य मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाप्रसंगी युवा कार्यकर्ते सचिन वेलादी, संतोष आत्राम, कुशाल आत्राम, दिलीप कुडमेथे, साईनाथ पेंदोर, जगदिश कुमरे, नरेंद्र वलके व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.नृत्य स्पर्धेतील विजेत्यांना पुरस्कारगोंडी ढेमसा नृत्य स्पर्धेत प्रथम पुरस्कार जय जंगो महिला पुरूष मंडळ, द्वितीय जय जंगो ढेमसा मंडळ शिर्शी, तृतीय जय बिरसा मुंडा ढेमसा मंडळ मांडवा, चतुर्थ वीर बिरसा मुंडा ढेमसा मंडळ केळझर आणि पाचवा पुरस्कार सावलहिरा येथील जय गोंडवाना ढेमसा मंडळाला देण्यात आला.
आदिवासींनी संघर्षदायी इतिहासापासून बोध घ्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 11:09 PM
आदिवासींनी जल, जंगल व जमीन सुरक्षित ठेवण्यासाठी प्रचंड संघर्ष केला. निसर्ग हेच त्यांच्या जगण्याचे प्रमुख साधन असून हे हक्क डावलणाऱ्या शक्तींविरुद्ध लढा दिला.
ठळक मुद्देविजया खंडाते : वामनपल्ली येथे गोंडीधर्म संमेलन व समाज प्रबोधन