शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
3
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
4
सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
5
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
6
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
7
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
8
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
9
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
10
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
11
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
12
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
13
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
14
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
15
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
16
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
17
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
18
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
19
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
20
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?

प्रशासन जनतेपर्यंत पोहोचविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 10:40 PM

महाराष्ट्रात आजघडीला चंद्रपूरची विकासात वेगाने वाटचाल होत आहे. राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यात कामे करण्याची प्रचंड उर्जा आहे. त्यामुळे विकासाची गती सतत वाढण्यावरच आपला भर असेल. आशुतोष सलिल यांनी जिल्हाधिकारी म्हणून लोकाभिमुख असे कर्तव्य बजावले.

ठळक मुद्देकुणाल खेमणार : चंद्रपूरची विकासातील गती कायम ठेवणार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महाराष्ट्रात आजघडीला चंद्रपूरची विकासात वेगाने वाटचाल होत आहे. राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यात कामे करण्याची प्रचंड उर्जा आहे. त्यामुळे विकासाची गती सतत वाढण्यावरच आपला भर असेल. आशुतोष सलिल यांनी जिल्हाधिकारी म्हणून लोकाभिमुख असे कर्तव्य बजावले. यापुढे जनतेला प्रशासनाकडे येण्याची गरज भासू नये, प्रशासनच त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न असेल. यासाठी टेक्नॉलॉजीचा अधिक वापर करणार असे ‘व्हिजन’ आपले आहे, अशी माहिती चंद्रपूरचे नवे जिल्हाधिकारी कुणाल खेमणार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर शनिवारी पत्रकारांशी बोलताना दिली.विदर्भाशी कधीही संबंध आला नाही. मात्र अवघ्या महाराष्ट्रात चंद्रपूरची विकासाच्या बाबतीत सुरू असलेली वाटचाल बघून आपणही चंद्रपूरात जावून कर्तव्य बजावावे असे मनोमनी वाटत होते. आणि अनपेक्षितपणे पहिल्यांदा जिल्हाधिकारी होऊन चंद्रपूरला जात असल्याबद्दल आनंद झाला. चंद्रपुरात येऊन २४ तास उलटायचे आहे. मात्र आशुतोष सलील यांनी जिल्हाधिकारी म्हणून चंद्रपुूरात केलेल्या कामांमुळे प्रभावित झालो.राज्याचे अर्थमंत्री चंद्रपुरातील आहे. त्यांच्यात काम करण्याची प्रचंड ऊर्जा आहे. ते न थकता कामे करतात, हे मंत्रालयात बघायला मिळत होते. चंद्रपुरात आता त्यांच्यासोबत प्रत्यक्ष काम करायला मिळणार आहे. चंद्रपूरला त्यांनी दिलेली विकासाची गती कुठेही कमी पडू देणार नाही. विकासाची आहे ती गती कायम ठेवून नवीन काहीतरी करण्याचा पूरेपूर प्रयत्न आपला असणार आहे, असेही जिल्हाधिकारी खेमणार म्हणाले.चंद्रपुरात मोठ्या प्रमाणावर वनक्षेत्र आहे. यासाठीही नवीन काही करण्याचा प्रयत्न राहील. शिवाय महिलांना रोजगारात वाढ करण्यावर आपला भर असेल. कोल्हापुरात जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी असताना २०० वरून दोन हजार शाळा डिजिटल केल्या. आता तेथील कान्व्हेंटचे विद्यार्थी जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेत आहे. मोफत पुस्तक देण्यापेक्षा गुणवत्ता वाढीवरच विद्यार्थी वाढतील हे साधे सूत्र आहे.गुणवत्तेवर भर दिला जाणार आहे. स्वच्छ विद्यालय, शाळा सिद्धी अतंर्गत चांगले काम करणाऱ्या शिक्षकांचा सत्कार केला जातो. हा अनुभव येथे कामी येईल.शिवाय महिलांच्या समस्या आणि लैंगिक शोषण यावर समाजातील मानसिकता बदलणे हे आपले आद्य कर्तव्य असणार आहे, असेही जिल्हाधिकारी कुणाल खेमणार यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.पाच वर्षांत चंद्रपूर होम टाऊन बनले - आशुतोष सलिलचंद्रपुरात पाच वर्षांचा कार्यकाळ घालविला. या जिल्ह्याशी आपले भावनिक नाते जुळले. हे शहर माझे होम टाऊनच बनले आहे. माझी मातृभाषा मैथिली आहे. गावाला गेल्यावर आईसोबत मातृभाषेत बोलताना मराठी शब्द आपसुकच येतात. तेव्हा तीहीसुद्धा म्हणायची. चंद्रपुरात अनेक कामे करायला मिळाली. कारण येथील राजकारण कधीच आडवे आले नाही. राजकीय नेत्यांचा दबाव कधीच नव्हता, तर त्यांचे पाठबळच मिळाले. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची कामे करण्याची गती आपल्यापेक्षाही अधिक आहे. त्यांना कधीही थकल्याचे पाहिले नाही. त्यांच्यामुळेच आपल्यामध्ये काम करण्याची नवी ऊर्जा संचारत होती. त्यांनी जे नवीन आहे ते करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिले होते. म्हणून चंद्रपुरात काम करण्याचा वेगळाच आनंद येत होता. मिशन शौर्य, हॅलो चांदा या सारखे उपक्रम राबविता आले. चंद्रपूरशी कधीही नाते तुटणार नाही. जेव्हाही संधी मिळेल तेव्हा चंद्रपुरात येत राहणार आहे. येथील जनतेनेही जे प्रेम केले ते कदापिही न विसरणारे आहे, अशा शब्दात चंद्रपूरचे मावळते जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. विधीचे शिक्षण घेण्याची खूप इच्छा होती. मास्टर्स फेलोशिपच्या माध्यमातून ही इच्छा पूर्ण करण्याची संधी मिळाली आहे. अमेरिकेत एक वर्षाची ही फेलोशिप आहे. ती पूर्ण केल्यानंतर जिथे संधी मिळेल त्या जिल्ह्यात कर्तव्य बजावणार असल्याचेही सलिल म्हणाले.