शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

क्रांतिभूमीच्या मातीने दिला प्रशासकीय अधिकारी

By admin | Published: July 08, 2015 1:21 AM

चिमूर तालुक्यातील राष्ट्रसंताच्या तपोभूमीच्या पायथ्याशी असलेल्या केवाडा (पेठ) या लहानशा गावातील एका विद्यार्थ्यांने मोठे यश संपादन केले आहे.

मुक्त विद्यापीठाची पदवी ठरली पाया : केवाडा (पो.) देशाच्या पटलावरराजकुमार चुनारकर खडसंगीचिमूर तालुक्यातील राष्ट्रसंताच्या तपोभूमीच्या पायथ्याशी असलेल्या केवाडा (पेठ) या लहानशा गावातील एका विद्यार्थ्यांने मोठे यश संपादन केले आहे. या क्रांतीभूमीने देशाला एक प्रशासकीय अधिकारी दिल्याने चिमूरचे नाव आणखी एकदा देशाच्या पटलावर आले आहे.देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात चिमूर क्रांतीचे नाव आजही अजरामर आहे. याच तालुक्यातील केवाडा (पेठ) या १७३७ लोकसंख्येच्या गावात बालपण गेलेल्या संदीप गोपालदास मोहुर्ले याने युपीएससी परीक्षेत ७३० वा मेरीट येऊन गावाचे नाव देशाच्या पलाटावर आणले आहे. संदीप हा भंडारा जिल्ह्यात शिक्षक म्हणून कार्यरत आहे. मात्र त्याने शिक्षकी पेशावरच समाधान न मानता मोठा अधिकारी बनण्याचा चंग बांधला. याकरिता संदीपने मुक्त विद्यापीठातून पदवीचे शिक्षण घेतले व आयएएस परीक्षेच्या दृष्टीने शिक्षकी पेशा सांभाळून परिश्रमास सुरूवात केली. त्याला पहिल्या प्रयत्नात यश आले नाही. मात्र दुसऱ्या प्रयत्नामध्ये संदीपने केंद्र शासनाच्या युपीएससी परीक्षेत (७३०) वा मेरीट येऊन प्रशासकीय सेवेत मोठे यश संपादन केले आहे. राष्ट्रसंताची तपोभूमी असलेल्या गोदेडाच्या पायथ्याशी असलेल्या केवाडा या लहानशा गावात राहणाऱ्या लक्ष्मण रामजी मोहुर्ले यांना गोपालदास व पटवारी असे दोन अपत्य. त्यापैकी संदीपचे वडील गोपालदास यांना शासकीय नोकरीकरीता गाव सोडावे लागले व ते नोकरीकरिता गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी येथे स्थायीक झालेत.संदीप मोहुर्ले यांचे प्राथमिक शिक्षण गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा येथे झाले. त्यानंतर वडसा व गडचिरोली येथून डी.एड. पर्यंत शिक्षण घेतले. डीएडनंतर त्यांनी भंडारा जिल्ह्यात शिक्षकी पेक्षा स्वीकारला. आज घडीला संदीप लाखांदूर तालुक्यातील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये सहायक शिक्षक पदावर कार्यरत आहेत. प्रस्तुत प्रतिनिधीने संदीपची भेट घेऊन विचारणा केली असता, त्याने सांगितले माझे शिक्षण आदिवाही बहुल जिल्हा असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात झाले. बाबाच्या नोकरीनिमित्त आम्ही बाहेर गेलो असलो तरी बाबाचे जन्मगाव चिमूर तालुक्यातील केवाडा असल्याने या गावाशी माझे नाते आहे. त्यामुळे केवाडा गावाविषयी मला आपुलकी आहे. आजही बाबाची शेती केवाडा येथे असून माझे काका पटवारी मोहुर्ले राहतात. त्यामुळे मी या गावात जात असतो. तेव्हा या गावासाठी काहीतरी करण्याची जिद्द असल्याचेही सांगितले. तर गाव खेड्यात सामाजिक समता प्रस्तावित करुन शांतात टिकवण्यासाठी प्रयत्न करून गावखेड्यातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार असल्याचेही संदीपने ‘लोकमत’ला सांगितले.